उत्तर महाराष्ट्र

विद्यार्थिनीवर खासगी क्‍लासमधील शिक्षकाचा अत्याचार

सकाळवृत्तसेवा

नाशिक रोड - विद्यार्थिनीचा विश्‍वास संपादन करून तिचे मोबाईलवर अश्‍लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर वेळोवेळी अत्याचार केला.

एकलहरे मार्गावरील बारावीत शिकणाऱ्या पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की सप्टेंबर २०१६ मध्ये खासगी क्‍लासमध्ये इंग्रजी शिकण्यासाठी ती जात होती. शिक्षक अनिल अवचरे याचे पीडित युवतीच्या वडिलांशी घरोब्याचे संबंध असल्याने त्याचे कायम घरी येणेजाणे होते. एकदा घरी कोणी नसताना अवचरे आला व घराचे दार बंद करीत युवतीवर अत्याचार केला. मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अनेकदा अत्याचार केला. त्याचे लग्न झाल्यानंतरही त्याने अनेकदा असाच प्रकार केला. पीडित मुलीने याबाबत घरच्यांना सांगितले. त्यांनी तत्काळ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी संशयित अवचरे याच्याविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT