Teacher esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शिक्षकांचा मेडिकल बिल, रजा रोखीकरणाचा प्रश्न सुटला?

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : धुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मेडिकल बिल तसेच रजा रोखीकरणाच्या बिलांसाठी शिक्षण विभागाकडून अतिरिक्त बीडीएस उपलब्ध करून देण्यात आला असून, ही बिले ऑफलाइन पद्धतीने देण्यास परवानगी मिळाल्यामुळे शिक्षकांचा मागील चार वर्षांपासून प्रलंबित मेडिकल बिलांचा प्रश्न मार्गी लागला आहे. (problem of teachers medical bill leave encashment is solved dhule news)

यासाठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्षा शुभांगी पाटील यांचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. त्यामुळे शिक्षकांत समाधान व्यक्त होत आहे.

मेडिकल व रजा रोखीकरण बिले अतिरिक्त बीडीएस उपलब्ध नसल्याने मागील गेल्या सुमारे तीन ते चार वर्षांपासून प्रलंबित होती. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्षा शुभांगी पाटील यांचा सुरवातीपासूनच शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. पण शासनाकडून ऑफलाइन पद्धतीने बिल देण्यासाठी आदेश होत नव्हते, तसेच पगाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही बिलांसाठी अतिरिक्त बीडीएस उपलब्ध होत नव्हता.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

शुभांगी पाटील यांनी शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक व मंत्रालय येथे पाठपुरावा केला. हा प्रश्न धुळे जिल्ह्यासह जळगाव, नंदुरबार व अन्य जिल्ह्यांतही प्रलंबित होता.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनतर्फे जिल्हास्तरापासून ते थेट मंत्रालयापर्यंत अनेक वेळा पाठपुरावा केल्यावर शिक्षण विभागाकडून मेडिकल बिलांसाठी, रजा रोखीकरणासाठी अतिरिक्त बीडीएस उपलब्ध करून देण्यात आला तसेच ही बिले ऑफलाइन पद्धतीने देण्यास परवानगी दिली.

"शिक्षक किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा आजाराप्रसंगी रुग्णालयात रोखीने पैसा दिला जातो. पण तो पैसा परत मिळण्यासाठी तसेच मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरणाचे पैसे मिळण्यासाठी चकरा माराव्या लागल्या. त्यांपैकी काही कर्मचाऱ्यांचे पैसे न मिळता कोरोनात निधनही झाले. आता हा प्रश्न सुटल्याने कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून, अनेकांनी मोबाईलद्वारे आभार मानले आहेत." -शुभांगी पाटील, राज्याध्यक्षा, महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT