Prohibition orders dhule latest marathi news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश

सकाळ वृत्तसेवा

धुळे : उच्च माध्यमिक व शालान्त परीक्षेच्या (Exams) पार्श्वभूमीवर धुळे व साक्री तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर (Exam Centers) सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. (Prohibition order in examination center area Dhule Latest Marathi News)

श्रीमती धोडमिसे यांनी म्हटले आहे, पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यात २१ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत उच्च माध्यमिक (१२ वी), तसेच २७ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत माध्यमिक शालान्त (१० वी) परीक्षा घेण्यात येणार आहे.

यात (ज्या दिवशी पेपर राहील त्या दिवसांकरिता) रोज सकाळी आठपासून ते सायंकाळी साडेसहापर्यंत परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर अंतरापर्यंतच्या परिसरात झेरॉक्स, फॅक्स मशिन, लॅपटॉप, एसटीडी बूथ व मोबाईल फोनच्या वापरावर फौजदारी तरतुदीनुसार मनाई आदेश जारी आहेत.

धुळे शहर व साक्री तालुक्यातील परीक्षा केंद्रांची नावे अशी (अनुक्रमे केंद्राचे नाव, परीक्षा केंद्र या क्रमाने) : जिजामाता हायस्कूल, धुळे (बारावी), छत्रपती शिवाजी हायस्कूल, धुळे (दहावी). तु. ता. खलाणे महाजन हायस्कूल, धुळे (बारावी), एल. एम. सरदार हायस्कूल, देवपूर, धुळे (दहावी). साक्री, न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय, साक्री (बारावी), न्यू इंग्लिश स्कूल, साक्री (दहावी).
या परीक्षा कालावधी दरम्यान परीक्षा केंद्राच्या २०० मीटरचे परिसरात परीक्षार्थीशिवाय इतर कोणासह प्रवेश असणार नाही. असेही उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: भरधाव मोटारीच्या धडकेत कोथरूडच्या तरुणाचा अंत; संगमनेर-नऱ्हे रस्त्यावर भीषण अपघात!

समुद्रात बुडून पती राहुलचा मृत्यू झाल्यानंतर आता पत्नीने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणते- आम्हाला सगळ्यांनाच मोठा...

Karjat Accident: कर्जत रस्त्यावर अपघात, सात विद्यार्थी जखमी; अकलुज येथील वॉटरपार्कला जात हाेते अन् अचानक काय घडलं!

Latest Marathi News Live Update : लातूरमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा कायम, गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांग

Laptop Safety Tips : काय तुम्हीपण गादीवर लॅपटॉप ठेऊन चार्ज करताय-काम करताय? आजपासून बंद करा 'या' ३ चुका, नाहीतर होईल मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT