Property tax was collected double instead of 5 times in dhule news sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Property Tax: धुळेकरांकडून पाचपट ऐवजी दुप्पटीने मालमत्ता कर वसुली

धुळेकरांना पाच, सहा , दहा, पंधरा पट नव्हे तर केवळ दुप्पटीने मालमत्ता कर भरावा लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Property Tax: धुळेकरांना पाच, सहा , दहा, पंधरा पट नव्हे तर केवळ दुप्पटीने मालमत्ता कर भरावा लागणार आहे.

याकामी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागिरदार आणि शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांनी पाठपुरावा केल्याने दिलासा मिळणार असल्याची माहिती बुधवारी (ता. २७) दिली. (Property tax was collected double instead of 5 times in dhule news)

शहरातील वाढीव मालमत्ता करवसुलीप्रश्‍नी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. गोविंद राज यांना उचित कार्यवाही संदर्भात निर्देश दिले. त्यानुसार श्री. जहागीरदार आणि श्री. चौधरी यांनी मुंबईत प्रधान सचिव डॉ. गोविंद राज यांच्याशी चर्चा केली. महापालिकेने धुळेकरांना दुप्पट, तीप्पट नव्हे तर पाचपट, दहा पट, पंधरा पटीने किंवा त्याहून अधिक पटीने मालमत्ता करात वाढ केली.

अशा करवाढीच्या ओझ्याखाली धुळेकर दबले गेले आहेत. महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांनी श्री. जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली लक्षवेधी आंदोलन केले.

तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे वाढीव मालमत्ता कराचा प्रश्‍न सोडविण्याबाबत पत्रव्यवहार केला.

त्यानुसार नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. गोविंद राज यांच्याशी श्री. जहागीरदार, श्री. चौधरी यांनी चर्चा केली. उपमुख्यमंत्री पवार यांनीही मालमत्ता कर पाच पट किंवा त्यापेक्षा अधिक नव्हे तर दुप्पट आकारणीबाबत सचिवांना निर्देश दिले. त्याप्रमाणे पुढील आठवड्यात प्रधान सचिव डॉ. गोविंद राज हे धुळे महापालिकेच्या आयुक्तांना चर्चेला बोलवून त्याबाबत निर्देश देतील, असे श्री. जहागीरदार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : दिवाळीला आजीबाईंची एकही पणती विकली गेली नाही, पण पोलिसांनी जे केले ते पाहून तुमचंही हृदय भरुन येईल 

Tragic Accident Kolhapur : चुकीच्या दिशेने आयशर टेम्पो आल्याने कोल्हापूर –राधानगरी रस्त्यावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

४ वर्षांनी संपणार स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका; 'या' दिवशी प्रदर्शित होणार शेवटचा भाग, असा होणार शेवट

Mohammed Shami चा काढला काटा! सातत्याने धावा करणाऱ्या 'मुंबई'च्या खेळाडूकडे आगरकरचं दुर्लक्ष; पुनरागमन झालं अशक्य

आणि असरानी यांची ती शेवटची इच्छा अधुरीच राहिली; चाहतेही हळहळले

SCROLL FOR NEXT