SYSTEM
उत्तर महाराष्ट्र

OBC Reservation : भाजप ओबीसी मोर्चातर्फे धुळ्यात निषेध आंदोलन

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा गळा घोटत आहे असा आरोप करत भाजप ओबीसी मोर्चाने गुरुवारी येथे महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : ओबीसी आरक्षणप्रश्‍नी (OBC Reservation) राज्यातील महाविकास आघाडी सरकार गेली अडीच वर्ष कुंभर्णाप्रमाणे झोपेचे सोंग घेऊन ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा गळा घोटत आहे असा आरोप करत भाजप ओबीसी मोर्चाने गुरुवारी येथे महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi Govt) निषेध केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) गेल्या दोन वर्षापासून वेळोवेळी ट्रिपल टेस्ट करा असे सांगत आहेत. मात्र आघाडी सरकार १७ नंबरचा फॉर्म भरून पास झाल्याप्रमाणे वागत आहे. सतत केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. ओबीसी आरक्षणासाठी निरगुडे आयोग नेमला. आयोगाला ४५३ कोटी रुपये फक्त जाहीर केले. मात्र, आयोगाला दमडीही न दिल्यामुळे आयोगाने सरकारी दप्तरातला डेटा अर्धवट व विनास्वाक्षरी पुढे पाठवून दिला. यातून एकप्रकारे ओबीसी समाजाबाबत अनास्था दाखवल्याचे भाजप ओबीसी आघाडीने म्हटले आहे. मध्य प्रदेश सरकारने पूर्णपणे लक्ष देऊन इम्पेरिकल डेटा व ट्रिपल टेस्ट पूर्ण करून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मिळवले. मात्र त्यानंतरही भाजपशासित राज्य असल्यामुळे मध्य प्रदेशला ते मिळाल्याची आरोळी ठोकली जात आहे. ‘नाचता येईना, अंगण वाकडे’ अशी राज्य सरकारची गत असल्याची टीका करत भाजप ओबीसी मोर्चाने राज्य सरकारचा निषेध केला. या आंदोलनात भाजपचे राजवर्धन कदमबांडे, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी, जिल्हाध्यक्ष दिनेश बागूल, युवराज पाटील, भारती माळी, प्रतिभा चौधरी, विक्की परदेशी, प्रा. सागर चौधरी यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा यात सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT