Protests against Hit and Run Act dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : योग्य निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; हीट अँड रन कायद्याविरोधात निदर्शने

केंद्र शासनाने हीट अँड रन या नवीन कायद्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा अनेक संघटना रस्त्यावर उतरून याविरोधात आंदोलन करतील असा इशारा द बस ड्रायव्हर ग्रुपतर्फे देण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : केंद्र शासनाने हीट अँड रन या नवीन कायद्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा अनेक संघटना रस्त्यावर उतरून याविरोधात आंदोलन करतील असा इशारा द बस ड्रायव्हर ग्रुपतर्फे देण्यात आला.

याप्रश्‍नी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली, प्रशासनाला निवेदन दिले. (Protests against Hit and Run Act dhule news)

केंद्र शासनाने ३० डिसेंबर २०२३ ला भादंवि कलम २७९ (हीट अँड रन) बाबत घेतलेला निर्णय हा पूर्णतः: एकतर्फी असून तो ड्रायव्हर संघटनांवर अन्यायकारक आहे. या बदलाबाबत सरकारने कुठल्याही संघटना, संघटनांचे अध्यक्ष किंवा अन्य पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेतले नाही.

एकतर्फी निर्णय घेतला आहे. वास्तविक कुठलाही ड्रायव्हर हा अपघात स्वतःहुन कधीच करत नसतो. अपघात होण्यास अनेक कारणे असू शकतात.

मात्र, त्यात फक्त ड्रायव्हरला दोषी ठरविणे हे पूर्णतः चुकीचे असून या कायद्याबाबत घेतलेला एकतर्फी निर्णय आम्हाला मान्य नाही. त्यामुळे सहानुभूतिपूर्वक विचार करून बस चालकांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी संघटनेने केली.

मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकारी, बसचालक यांनी निदर्शने केली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

संघटनेचे सुरेश पाटील, निजाम शेख, योगेश्‍वर पाटील, समाधान पाटील, विशाल जमदाडे, भय्या पाटील, पप्पू थोरात, दत्तराज पदमर, भय्या चौधरी, आनंद माळी, सिद्धांत वीरकर, संजय कासार, चेतन जमदाळे, मलिक सिराज आदींसह ड्रायव्हर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT