Roller crushing a silencer in the presence of police officers. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शहर वाहतूक नियंत्रण पोलिसांनी फिरविला ‘तीन लाखां’वर रोलर

जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अशा बुलेटस्वारांचा आवाज दाबण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरात सार्वजनिक शांततेचा भंग करत फटाके फोडत भरधाव बुलेट चालविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेक ठिकाणी बुलेटस्वारांच्या उच्छादामुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अशा बुलेटस्वारांचा आवाज दाबण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.

त्यांनी बुधवारी (ता. ७) सकाळी शहरात नाकाबंदी करत तासाभरात तब्बल शंभरहून बुलेटधारकांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच सर्व बुलेटचे सायलेन्सर काढून त्यांच्यावर संतोषीमाता चौकात रोड रोलर फिरविला. (Punitive action was taken against more than hundred bullet holders Also remove silencer of all bullets and Turned the road roller them dhule news)

पोलिस अधीक्षक आणि शहर वाहतूक नियंत्रण पोलिसांच्या कारवाईचे शहरातील सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून बुलेट वाहनाला कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवून शायनिंग मारणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती.

काही बुलेटस्वार कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही करताना दिसत होते. परिणामी, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे अशा फटाके फोडणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाईचा आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी वाहतूक शाखेला दिला होता.

शिवाय कारवाई करतानाच बुलेटचे सायलेन्सर काढून घेण्याचेही निर्देश दिले होते. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार शहर वाहतूक शाखेने फटाके फोडणाऱ्या बुलेटधारकांवर कारवाई करण्यासाठी सकाळी साडेदहा ते साडेअकरा या वेळेत शहरातील रहदारीच्या चौकांमध्ये नाकाबंदी केली.

यात संतोषीमाता चौक, जयहिंद महाविद्यालय चौक, बारा पत्थर चौक आदी ठिकाणांचा समावेश होता. तासाभराच्या नाकाबंदीत सुमारे शंभर बुलेटधारकांना पकडण्यात आले. तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतानाच सायलेन्सर काढून घेण्यात आले.

यामुळे बुलेटधारकांचे धाबे चांगलेच दणाणले होते. सर्व शंभर सायलेन्सरवर संतोषीमाता चौकात रोड रोलर फिरविण्यात आला. स्थानिक बाजारात एका सायलेन्सरची किंमत अंदाजे तीनशे रुपये आहे. त्यानुसार एकूण तीन लाख किमतीचे सायलेन्सर नष्ट करण्यात आले.

तसेच बुलेटधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनात शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते, पोलिस उपनिरीक्षक हेमंत सोनार, सुनील इनमुलवार, संदीप ठाकरे व अंमलदारांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT