encroachments  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : रस्ते मोकळे होतील; मूळ समस्येचे काय? अतिक्रमणांचा प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील धुळे शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस प्रसिद्ध करून संबंधितांना आपापली अतिक्रमणे काढण्याचे आवाहन केले आहे.

सात दिवसांनंतर महसूल विभाग, धुळे महापालिका, पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातर्फे कारवाई करून ही अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. (PWD appeal concerned to remove encroachments dhule news)

शहरातील रस्त्यावरच्या अतिक्रमणांची गंभीर समस्या लक्षात घेता अशा कारवाईचे स्वागतच होणार आहे. मात्र, रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना पर्यायी व्यवस्थेचे काय, हा प्रश्‍न कायम राहणार आहे. संबंधित रस्ते मोकळे होतील पण दुसरीकडे अतिक्रमण होणार नाही याची शाश्‍वती कोण घेणार?

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी तथा रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष यांच्यासोबत ६ ऑक्टोबरला झालेल्या सभेतील निर्णयानुसार धुळे शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण महसूल विभाग, धुळे महापालिका, पोलिस विभाग (वाहतूक शाखा) व सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे यांच्या संयुक्‍त अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून (भाजी विक्रेते/खाद्यपदार्थ विक्रेते/लोटगाडीधारक व्यावसायिक/टपरीधारक व्यावसायिक/रस्त्यावर व्यवसाय करणारे व्यावसायिक/रस्त्यालगतच्या दुकानदारांनी रस्त्यावर ठेवलेले साहित्य/इतर अनधिकृत अतिक्रमणधारक/रस्त्यावर रहदारीस अडथळा ठरणारी उभी वाहने आदी) काढण्यात येणार आहे.

त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे महामार्ग प्राधिकारी तथा उपविभागीय अभियंता डी. बी. झाल्टे यांनी नोटीस प्रसिद्ध करून संबंधितांना आपापली अतिक्रमणे तत्काळ स्वतःहून स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन केले आहे. अतिक्रमणधारकांनी स्वतःहून सात दिवसांत अतिक्रमण काढून न घेतल्यास संयुक्‍त अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमण काढून साहित्य/टपरी/दुकान आदी शासनजमा करण्यात येईल.

जमा केलेले साहित्य/टपरी/दुकान इत्यादी अतिक्रमण निर्मूलन समितीने निश्चित केलेले दंड शुल्क शासनजमा करून दुसऱ्या दिवशी परत करण्यात येईल. या कार्यवाहीत आपल्या साहित्याचे नुकसान झाल्यास या कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही, असा इशाराही त्यांनी नोटिशीतून दिला.

पर्यायी व्यवस्थेचे काय?

रस्त्यावरील अतिक्रमणाची गंभीर समस्या वर्षानुवर्षे कायम असताना व ही समस्या दिवसेंदिवस वाढत असताना धुळे महापालिकेसह संबंधित यंत्रणांकडून त्यावर तोडगा काढला जात नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या बैठकीनुसार शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या कारवाईचे स्वागतच होणार आहे.

मात्र, या कारवाईनंतर समस्या कायमची सुटणार आहे का, हा खरा प्रश्‍न आहे. कारण, यापूर्वीदेखील अनेकदा कारवाया झाल्या, मात्र रस्त्यांवर अतिक्रमण करून छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्यांना पर्यायी जागाच यंत्रणेकडून उपलब्ध केली जात नाही ही वस्तुस्थिती आहे. जागा उपलब्ध केली तर विक्रेत्यांना त्या सुटेबल होत नाहीत परिणामी तिढा कायम राहतो.

त्यामुळे या कारवाईनंतर किती दिवस रस्ते मोकळा श्‍वास घेतील, हा प्रश्‍न आहे. शिवाय यामुळे इतर ठिकाणी अतिक्रमण होणार नाही याची शाश्‍वती कोण घेणार हाही तेवढाच रास्त प्रश्‍न आहे.

या रस्त्यांवरील अतिक्रमण हटणार

आग्रा रोड (भाग नगावबारी ते गांधी पुतळ्यापर्यंत), आग्रा रोड (गांधी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा), आग्रा रोड (भाग- छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते गुरुद्वारापर्यंत), चाळीसगाव रस्ता (छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा- श्रीराम पेट्रोलपंप ते चाळीसगाव चौफुली), पारोळा रस्ता (जुनी महापालिका इमारत ते कृषी महाविद्यालय), दत्त मंदिर चौक (देवपूर) ते वलवाडी गाव, साक्री रोड (हनुमान टेकडी ते गुरुशिष्य स्मारक, नवीन महापालिकेपर्यंत).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT