Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : स्थायी समितीसह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह; कुत्रे निर्बीजीकरणही ‘फेल’

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महापालिकेच्या मागील स्थायी समितीपुढे सभापतींच्या पत्राने आलेला स्वयंभू ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या कामाबाबत निर्णय घेण्याचा तहकूब विषय गुरुवार (ता. ७)च्या स्थायी समिती अजेंड्यावरून गायब झाला आहे.

अत्यंत तातडीने अजेंड्यावर घेतलेल्या या विषयाचे नेमके काय झाले, असा प्रश्‍न त्यामुळे उपस्थित होत आहे.

अशा प्रकारामुळे मात्र स्थायीच्या कार्यपद्धतीवरच प्रश्‍नचिन्ह उभे राहण्याची चिन्हे आहेत. याशिवाय मोठ्या मुश्‍किलीने मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम दिलेल्या संस्थेचा करारनामा रद्द करण्याची वेळही स्थायी समितीवर आली आहे. (Question marks on functioning of administration with standing committee dhule news)

महापालिकेच्या स्थायी समितीच्या मागील साप्ताहिक सभेपुढे सभापती किरण कुलेवार यांच्या पत्रानुसार मनपा क्षेत्रातील घनकचरा संकलन व वाहतूक प्रक्रियेबाबत निर्णय घेण्याचा विषय ठेवण्यात आला होता. या विषयावर खुद्द सभापती श्रीमती कुलेवार यांनी कचरा संकलनाबाबत अत्यंत गंभीर समस्या आहे.

स्वयंभू कंपनीकडून अटी-शर्तीप्रमाणे काम होत नसल्याचे, कामाचा अहवाल सादर केलेला नसल्याचे म्हणत यावर अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाकडून व्हावेत, असे निर्देश दिले होते. तर सत्ताधारी भाजप सदस्य सुनील बैसाणे यांनी स्वयंभू कंपनीचा इतिहास काढत वर्तमान कामावरही गंभीर आरोप केले होते.

स्वयंभू कंपनीवर सर्वांचे एवढे प्रेम का, असा सवालही त्यांनी केला होता. स्वयंभूच्या कामाबाबत प्रशासनाचे काय निरीक्षण आहे याचा खुलासा करावा, अशी मागणी केली होती. त्यावर प्रशासनाकडून उपायुक्त विजय सनेर यांनी अहवालासाठी थोडा अवधी द्यावा, अशी विनंती केली होती. शेवटी सभापती श्रीमती कुलेवार यांनी पुढच्या सभेत सविस्तर खुलासा करण्याचा आदेश देत विषय तहकूब केला होता.

त्यामुळे पुढच्या सभेत हा विषय येणे अपेक्षित होते. मात्र गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या अजेंड्यावर या विषयाचा पत्ताच नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे सभापतींचे पत्र, सदस्यांचे आरोप, प्रशासनाने मागितलेला अवधी या सर्व प्रश्‍नांचे काय झाले याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

अर्थात यावर प्रशासनासह पदाधिकारी, सदस्यांकडून विविध कारणे पुढे येतील पण ज्या विषयांवर पदाधिकारी, सदस्य आदळआपट करतात, त्या विषयांवर नंतर एकतर तत्काळ कार्यवाही होत नाही किंवा ते विषय थंड बस्त्यात जातात. त्यामुळे स्थायी समितीच्या कार्यपद्धतीवरच प्रश्‍नचिन्ह उभे राहत आहे.

कार्यादेश रद्द करण्याची वेळ

धुळे मनपा हद्दीतील मोकाट व भटके श्‍वान निर्बीजीकरण, शस्त्रक्रिया, लसीकरण कामाचा कार्यादेश व करारनामा रद्द करण्याचा विषय स्थायी समितीपुढे आला आहे. मोकाट कुत्र्यांच्या विषयावर विद्यमान सभापती श्रीमती कुलेवार यांनी त्या सदस्य असताना मोठ्या तक्रारी केल्या होत्या. याशिवाय इतर सदस्य आजपर्यंत तक्रारी करत आहेत.

मोठ्या मुश्‍किलीने कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम जयपूर येथील संतुलन जीवकल्याण या संस्थेला देण्यात आले होते. मात्र, संस्थेबाबत प्राणिमित्र संघटनेकडून तक्रारी झाल्याने हे काम अडकले. अखेर आता या संस्थेला दिलेला कार्यादेश, करारनामा रद्द करण्याची वेळ स्थायी समितीवर आली आहे. अर्थात मोकाट कुत्र्यांच्या विषयावरही महापालिकेची यंत्रणा, स्थायी समिती या विषयावरही सपशेल फेल ठरल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT