Mayor Pratibha Chaudhary, Deputy Mayor Nagsen Borse, Commissioner Devidas Tekale attended the meeting where the problems in the wards were discussed. In front, corporators, officials. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: आदेशावर कार्यवाही करणार की नाही? स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील स्वच्छतेचा कारभार व्यवस्थित चालावा यासाठी नगरसेवकांनी स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी केली. खुद्द महापौरांसह इतर पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला त्याबाबत आदेश दिले.

विशेष म्हणजे बऱ्याच स्वच्छता निरीक्षकांनादेखील बदल्या व्हाव्यात असे वाटते. अशी सर्व स्थिती असताना महापालिका प्रशासनाकडून बदल्या का होत नाहीत, असा प्रश्‍न उभा राहिला आहे. सोमवारी (ता. ३) महापालिकेत झालेल्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित झाला.

त्यामुळे आता प्रशासनाकडून कार्यवाही होणार की पदाधिकाऱ्यांच्या आदेशाला पुन्हा केराची टोपली दाखविली जाणार याकडे लक्ष असणार आहे. (Question of transfers of sanitation inspectors sanitation workers dhule news)

महापालिकेत सोमवारी प्रभागांमधील समस्या निराकरणाच्या अनुषंगाने महापौर प्रतिभा चौधरी यांनी बैठक घेतली. उपमहापौर नागसेन बोरसे, आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर, उपायुक्त विजय सनेर, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. बैठकीत नेहमीप्रमाणे स्वच्छता, सार्वजनिक शौचालयांचा प्रश्‍न, एलईडी आदी विषयांवर नगरसेवकांनी प्रश्‍न उपस्थित केले.

यात नगरसेविका कल्याणी अंपळकर, सुनील बैसाणे, संतोष खताळ आदींनी स्वच्छता विभागातील समस्यांवर प्रश्‍न मांडले. स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची मागणी झाल्यानंतर व खुद्द महापौरांनी आदेश दिल्यानंतरही कार्यवाही होत नसल्याचे सदस्य म्हणाले. महापौर श्रीमती चौधरी यांनीही याबाबत विचारणा केली.

आपण कार्यवाही करत नाही त्यामुळे आमच्या आदेशांना केराची टोपली दाखविली अशा बातम्या झळकतात, असेही त्यांनी बोलून दाखविले. दरम्यान, या विषयावर प्रशासनाकडून बघू, करूचेच आश्‍वासन दिले गेले. त्यामुळे स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची कार्यवाही होणार की महापौरांसह इतर पदाधिकाऱ्यांच्या आदेशाला पुन्हा केराची टोपली दाखविली जाणार याकडे लक्ष असणार आहे.

कामाचा बोजा कमी करा

स्वच्छता निरीक्षकांवर कामाचा बोजा असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित झाला. नगरसेवक खताळ यांनी आपल्या प्रभागातील स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे यांच्याकडे मुख्य स्वच्छता निरीक्षकासह प्रभागाची जबाबदारी आहे.

त्यामुळे ते आपल्या प्रभागात जास्त लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील भार कमी करावा, अशी मागणी केली. दरम्यान, कामाचा बोजा असल्याच्या तक्रारी खुद्द स्वच्छता निरीक्षकांच्याही असल्याचे सांगितले जाते.

त्यामुळे याबाबत प्रशासन काय निर्णय घेणार याचीही प्रतीक्षा आहे. नगरसेवक बैसाणे यांनी असक्षम लोकांकडे स्वच्छता विभागातील काही जबाबदाऱ्या सोपविल्या गेल्याचे सांगितले.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

अहवाल सादर करा

नगरसेवक अमीन पटेल यांनी प्रभागातील एलईडीचा प्रश्‍न मांडला. नगरसेवक नरेश चौधरी यांनी प्रभागातील सार्वजनिक शौचालयांच्या हस्तांतराचा प्रश्‍न पुन्हा मांडला. दरम्यान, नगरसेवकांनी मांडलेल्या प्रश्‍नांवर कार्यवाही करून तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौर श्रीमती चौधरी यांनी दिले.

नगरसेवक-अधिकाऱ्यांत धुसफूस

बैठकीत नगरसेवक-अधिकाऱ्यांमधील विसंवाद व त्यातून निर्माण होणारा मानसन्मानाचा मुद्दाही उपस्थित झाला. उपायुक्त डॉ. श्रीमती नांदूरकर यांच्या दालनात घडलेल्या प्रसंगाच्या अनुषंगाने नगरसेवक अमोल मासुळे यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

त्यावरून बैठकीत पुन्हा थोडा वादविवाद झाला. यात अधिकाऱ्यांकडून डॅशिंग इमेज दाखला देणे, नगरसेवकांकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ‘ड्रेसकोड’चा विषय उपस्थित करण्यापर्यंत टीकाटिप्पणी पाहायला मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6 Live Update: आली रे आली राधा मुंबईकर आली! सबसे पाटील राधा पाटीलची 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात एंट्री

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

SCROLL FOR NEXT