A wasteland due to lack of water. Damaged onion plant. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Agriculture News : पश्चिम पट्ट्यातील रब्बीपीक धोक्यात; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

मागीलवर्षी शेतकरी बांधवांना अस्मानी संकट व गारपिटीने मारले. तर यंदा पाऊस कमी झाला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Agriculture News : परिसरातील बल्हाणे, शेवगे, विरखेल, वंजारतांडा, वार्सा, उंभरपाटा सह पश्चिम पट्ट्यातील विहिरींच्या पाण्याची पातळी खालावल्याने रब्बी पिके धोक्यात आली आहे.

पाण्याअभावी येथील पिके कशी जगवावी असा प्रश्‍न येथील शेतकऱ्यांना पडला असून सर्वजण चिंतेत आहे. (Rabi crop threat in western belt raises farmers concerns dhule agriculture news)

मागीलवर्षी शेतकरी बांधवांना अस्मानी संकट व गारपिटीने मारले. तर यंदा पाऊस कमी झाला. कधी पावसाची ओढ तर कधी थोड्या वेळात अति पाऊस अशी स्थिती अनेक ठिकाणी उद्भवली. त्यात हवामानात बदल त्यामुळे शेतीचे उत्पादन कमी झाले आणि त्याचा फटका शेतकऱ्यांपासून ग्राहकांपर्यंत सर्वांनाच सहन करावा लागणार, हे निश्चित.

त्यातही याचा सर्वात जास्त दुष्परिणाम कोरडवाहू शेती करणाऱ्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबावर होणार आहे. अनियमित पावसाची झळ या शेतकऱ्यांना अधिक तीव्रतेने जाणवणार आहे.

सद्यःस्थितीत पिंपळनेरचे लाटीपाडा व नवापाडाचे जामखेली धरण जरी पूर्ण क्षमतेने भरले असले तरी या पाण्याचा फायदा धरण, नदी व पाट लगत शेतीला होणार आहे. मात्र पश्चिम पट्ट्यातील शेतातील विहिरींच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने शेतकरी बांधवांची चिंता वाढली आहे.

या भागात धरण परिसरात अंदाजे ८० टक्के तर इतर भागात ४० ते ४५ टक्के शेतीत लागवड झाली आहे. पेरणी केलेल्या पिकांना विहिरींचे पाणी पुरेल की नाही याची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे. पाण्याचे टँकर आणि चारा छावण्या हे या आपत्तीवरच तात्कालिक उत्तर आहे.

कमी झालेला पाऊस, विहिरींच्या पाण्याची पातळीत झालेली घट, व हवामानात झालेला बदल यामुळे कांदा रोप मर रोग, बुरशीने संकटे येत होती. जशी तशी लागवड केली परंतु लागवडीनंतरही मर रोग, पिंपळ रोग सुरुच आहे. यामुळे कांदा लागवड मोठ्या संकटात सापडली आहे.

तर याभागात मोठ्या प्रमाणात कांदा, गहू, मका, हरभरा, बाजरी रब्बी पिके पेरणीत घट झाल्याचे दिसून येते आहे. पेरणी केलेल्या पिकांना पाणी नाही मिळाले तर रब्बीतील आखात वाया जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेती संकटात सापडली असून, शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे.

''वातावरणातील बदल व विहिरींची पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. संकटांमुळे उत्पन्न कमी होते. उत्पन्न जास्त झाले तर शासनाच्या नियम व अटी वरुन भाव मिळत नाही. त्यामुळे उत्पादन घ्यावे तर कशाचे घ्यावे असा प्रश्‍न आहे.''- रवींद्र दाभाडे, शेतकरी, बल्हाणे

''साक्री तालुक्यात पाऊस कमी झाल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. पाण्याअभावी रब्बी हंगामात कांदा, गहु पिकांमध्ये घट झाली असून ते पिके धोक्यात आली आहे. येणाऱ्या काळात शेतकरी बांधवांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागण्याची भिती आहे.''- संजय भदाणे, शेतकरी, विरखेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT