This is how the railway station will be transformed. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : रेल्वेस्थानकाचा होणार कायापालट; अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेत धुळे रेल्वेस्थानकाचा समावेश करण्यात आला असून, पुनर्विकासासाठी नऊ कोटी १३ लाख रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. यातून धुळे रेल्वेस्थानक कात टाकेल, असा विश्‍वास संसदरत्न खासदार डॉ. भामरे यांनी व्यक्त केला.(railway station was included in Amrit Bharat Station scheme Dhule news )

‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत भारतीय रेल्वेची देशभरातील एक हजार ३०९ स्थानकांची पुनर्विकासासाठी निवड करण्यात आली आहे. यात भुसावळ विभागातील १५, तर मध्य रेल्वेच्या ७६ स्थानकांचा समावेश आहे.

खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नांनी यात धुळे रेल्वेस्थानकाचा समावेश आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अमृत भारत स्टेशन योजने’अंतर्गत भुसावळ विभागातील सहा रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकाची पायाभरणी नुकतीच केली, असे खासदार डॉ. भामरे यांनी म्हटले आहे.

रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे काम एक वर्षाच्या आत पूर्ण होण्याची अर्थात २०२४ मध्ये काम पूर्ण केले जाईल, असेही खासदार डॉ. भामरे यांनी म्हटले आहे. या विकासकामाला भरीव निधी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

सुशोभीकरणात ही कामे

-वाहतूक प्रवाहात सुधारणा आणि फिरणाऱ्या क्षेत्रांचे सुशोभीकरण

-चांगले व विस्तीर्ण प्रवेशद्वार

-उच्चस्तरीय प्लॅटफॉर्म व प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त कव्हर (सल्टर)

-स्टेशन इमारतीच्या दर्शनी भागात व उंचीमध्ये सुधारणा

-शौचालयांच्या स्थितीत सुधारणा

-एक्झिक्युटिव्ह लाउंज, दर्जेदार फर्निचरसह वेटिंग रूम

-रॅम्प/लिफ्ट/एस्केलेटरसह १२ मीटर रुंद मध्यवर्ती एफओबी

-दुसऱ्या प्रवेशद्वारात सुधारणा

-स्टेशन परिसरात उत्तम प्रकाशव्यवस्था

-प्रसारित क्षेत्राभोवती सुंदर होर्डिंग्ज (चिन्ह)

-स्टेशन परिसरात योग्य प्रकारे डिझाइन केलेले चिन्ह

-स्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण

-सुनियोजित पार्किंग क्षेत्र

-ट्रेन इंडिकेटर बोर्ड व कोच मार्गदर्शन प्रणाली

-व्हिज्युअल डिस्प्ले युनिट्स व घोषणा प्रणाली

-दिव्यांगांसाठी सुविधा

-औपचारिक ध्वज

-स्टेशनच्या नावाचा एलईडी बोर्ड

-लँडस्केपिंग, हिरवळी भागांचा विकास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kokilaben Ambani Hospitalised : कोकिळाबेन अंबानी यांची अचानक तब्येत बिघडली, एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल

Maharashtra Latest News Live Update : गोदावरी नदीची पाणी पातळी पूर्वपदावर

Solapur Bailpola:'अकोलेकाटीत वीस वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या दारात होती बैलजोडी'; आज बोटावर मोजण्याइतक्याच; ट्रॅक्टरने बळकावली बैलांची जागा

South America Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने दक्षिण अमेरिका हादरली ! 8.0 इतकी तीव्रता, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Nations Cup 2025: नेशन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघाचे शिबिर सुरू; सहा दिवसांनंतरही ३५ पैकी २५ खेळाडूंचीच उपस्थिती

SCROLL FOR NEXT