Sub-Divisional Police Officer Datta Pawar, Chetak Festival President Jaipalsinh Rawal, Sarpanch Prithviraj Singh Rawal and dignitaries along with Sardarji horse of Rajasthan, the winner of horse beauty contest at Chetak Festival. esakal
उत्तर महाराष्ट्र

Sarangkheda Yatra : सौदर्य स्पर्धेत राजस्थानचा ‘सरदारजी’ प्रथम; अश्वांच्या विविध स्पर्धांना देशभरातून प्रतिसाद

सारंगखेडा (ता. शहादा) येथील चेतक फेस्टिव्हलमध्ये अश्वांच्या बाजारात अश्वांच्या विविध स्पर्धांना सुरवात झाली असून, चेतक इक्वेस्टेरियन प्रतियोगितेंतर्गत नुकरा प्रजातीच्या अश्‍वांची सौंदर्य स्पर्धा झाली.

सकाळ वृत्तसेवा

Sarangkheda Yatra : सारंगखेडा (ता. शहादा) येथील चेतक फेस्टिव्हलमध्ये अश्वांच्या बाजारात अश्वांच्या विविध स्पर्धांना सुरवात झाली असून, चेतक इक्वेस्टेरियन प्रतियोगितेंतर्गत नुकरा प्रजातीच्या अश्‍वांची सौंदर्य स्पर्धा झाली.

त्यात राजस्थानच्या अर्शदीपसिंह यांचा ‘सरदारजी’ नावाचा घोडा प्रथम आला. (Rajasthan Sardarji stands first in beauty competition of horse nandurbar sarangkheda yatra news)

दरम्यान, अश्‍व बाजारात दोन दिवसांत ३१ लाखांची उलाढाल झाली असून, दोन हजार ७०० हून अधिक घोडे दाखल झाले आहेत. सारंगखेडा येथे चेतक इक्वेस्टेरियन प्रतियोगिता सुरू आहे. त्यात नुकरा प्रजातीच्या घोड्यांची सौंदर्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक गंगानगर (राजस्थान)च्या अर्शदीपसिंह यांच्या सरदारसिंग नावाच्या घोड्याने पटकावला.

द्वितीय आसमान (पंजाब); तर तृतीय क्रमांकाने समंदर कंनोज (उत्तर प्रदेश) विजयी झाले. या स्पर्धेत उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील नामवंत व देखणे घोडे सहभागी झाले. घोड्यांची उंची, रंग, चाल, डोळे, शरीराचा बांधा यांचे परीक्षण करून विजेता घोषित करण्यात आला.

स्पर्धेत एकूण ३१ घोड्यांचा सहभाग होता. विजेत्या अश्वाला मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. चेतक इक्वेस्टेरियन प्रतियोगितेत विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. टेंट पेगिंग, पोल बेंडिंग, हॉर्स जंपिंग, बॉल इन बकेट, ड्रेसाज, अश्व दौड रेवाल व विविध अश्व प्रजातींच्या अश्व सौंदर्य स्पर्धा घेतल्या जातील.

पिंदर शेरीवाला (भटिंडा, पंजाब), विकास बोयतकर (पुणे महाराष्ट्र), यारविंदर सिंग (मुकसर, पंजाब) यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. चेतक फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, प्रणवराजसिंह रावल, रणवीरसिंह रावल, पोलिस उपनिरीक्षक नीलेश बारे आदी उपस्थित होते.

३१ लाखांची उलाढाल

सारंगखेडा येथील अश्‍व बाजारात दोन हजार ७०० हून अधिक घोडे खरेदी-विक्रीसाठी दाखल झाले आहेत. भारतातील विविध राज्यांतील घोडे, व्यापारी घोडे खरेदी-विक्रीसाठी येत असतात. दोन दिवसांत ३१ लाख २७ हजार ९१ रुपयांचे घोडे विक्री झाली.

आतापर्यंत सर्वांत महाग घोडा एक लाख ५१ हजारांचा विक्री झाला आहे. तो घोडा कोल्हापूर येथील बाळूमामा देवालय, आदमापूर यांनी विकत घेतला, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT