Raver Constituency Lok Sabha Election Result  
उत्तर महाराष्ट्र

Raver Constituency Lok Sabha Election Result : रावेरमध्ये रक्षा खडसेंची हॅट्रिक! शरद पवारांचे प्रयत्न अयशस्वी

Raver Lok Sabha Election Results 2024 BJP raksha khadse Sharad Pawar NCP Shriram Patil : या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी शरद पवार यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यामुळे या निकालाकडे सर्व राज्याचे लक्ष लागले होते.

रोहित कणसे

Raver Lok Sabha Election Results 2024 : भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघातून एकनाथ खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे यांना भाजपनं उमेदवारी दिली होती. अखेर खडसे यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे. २०१४ आणि २०१९ या दोनवेळा देखील रक्षा खडसे रावेरमधून खासदार म्हणून विजयी झाल्या होत्या.

रक्षा खडसे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचं आव्हान होतं. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी शरद पवार यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यामुळे या निकालाकडे सर्व राज्याचे लक्ष लागले होते. या लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघात ६४.२८ टक्के मतदानाची नोंद झाली होती.

रावेर लोकसभा मतदारसंधात जळगावचे पाच तर बुलढाणा जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन व भुसावळला संजय सावकारे हे भाजपचे आमदार आहेत. चोपड्याला लता सोनवणे (शिंदेगट), रावेरला शिरीष चौधरी (काँग्रेस) मुक्ताईनगरला चंद्रकांत पाटील (अपक्ष, शिंदे गटाला समर्थन) असे आमदार आहेत.

२०१९ चा निकाल काय होता?

२०१९मध्ये लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे (भाजप) ६५५३८६ मते घेऊन विजयी झाल्या होत्या तर त्यांचे विरोधक डॉ. उल्हास पाटील (काँग्रेस) यांना ३१९५०४ इतकी मते मिळाली होती. २००४ पासून २०१९ पर्यंत सर्व लोकसभा निवडणुकीत येथे भाजपचे वर्चस्व राहिले आहे. तर रक्षा खडसे तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. एकनाथ खडसेंमुळे रक्षा यांच्या उमेदवारीबद्दल भाजपचे पदाधिकारी नाराज असल्याचे निवडणुकीपूर्वी सांगितले जात होते. अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचीही रक्षा खडसेंच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली होती.

हे मुद्दे ठरले महत्वाचे

मतदारसंधातील मुद्द्यांबद्दल बोलायचे झाल्यास, अनेक वर्षांपासून रखडलेली बोदवड उपसा सिंचन योजना, प्रस्तावित तापी नदीवरील मेगा रिचार्ज स्कीम, केळी फळपीक विम्यापासून शेतकरी वंचित राहणे आणि केळीवरील प्रक्रिया उद्योगांना चालना, प्रोत्साहन देण्याची गरज हे मुद्दे लोकसभा निवडणुकीत चर्चेत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT