nandgaon
nandgaon 
उत्तर महाराष्ट्र

वास्तववादी वस्तुस्थितीचा दृष्टिकोन ठेवून कार्यरत राहिले पाहिजे - हरिश्चंद्र चव्हाण

सकाळवृत्तसेवा

नांदगाव - जनतेला दिलासा देण्यासाठी वास्तववादी वस्तुस्थितीचा दृष्टिकोन ठेवून कार्यरत राहिले पाहिजे अशी अपेक्षा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. खासदार चव्हाण यांच्या उपस्थितीत तालुका पंचायत समितीच्या सभागृहात लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त आढावा बैठक झाली त्यात ते बोलत होते.

माजी आमदार संजय पवार, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार भारती सागरे, गटविकास अधिकारी जगणराव सूर्यवंशी मुख्याधिकारी श्रिया देवचके, जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाबाई जगताप भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड, पंचायत समितीच्या सदस्या मधुबाला खिरडकर, श्रावण गोऱ्हे आदी व्यासपीठावर उपस्थित होते समस्याग्रस्त तालुक्यात असलेल्या समस्या जाणून घेण्यासाठीच्या बैठक होतच नसल्याने खासदार चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला जनतेने त्यामुळे आज मोठी गर्दी केली होती आपल्या समस्या सांगण्यासाठी यापूर्वी झालेल्या अपवादात्मक बैठकांतून काही निष्पन्न होत नसल्याचे सांगताना बैठकीला उपस्थित तालुक्यातील विविध गावातील लोकप्रतिनिधींनी खासदार चव्हाण यांच्या पुढ्यातच समस्यांचा उहापोह केला त्यातील प्रक्षोभ लक्षत घेत खासदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दहा सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीत आपण नांदगाव तालुक्यातील निर्माण झालेल्या परिस्थीकडे लक्ष वाढणार असल्याचे जाहीर केले. 

बैठकांना अनुस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याच्या सूचना त्यांनी तहसीलदार भारती सागरे यांना केली यंत्रणेतील अधिकारी काम करीत नसल्याने ओढवणाऱ्या अडचणींचा मुद्दा माजी आमदार संजय पवार यांनी लावून धरतांना खासदारांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली ३८ टक्के पाऊस झाल्याने पेरण्या झालेल्या आकडेवारीला विविध सरपंच सदस्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या सादर केलेल्या आकडेवारीला आक्षेप घेतला खरीप वाया गेल्याचे खासदार चव्हाण यांच्या लक्षात आणून दिले ४२ खेडी नाळ पाणी पुरवठा योजनेच्या अवस्थेबद्दल समितीचे अध्यक्ष बापू जाधव यांनी माहिती देताना योजना सांभाळायची कशी असा सवाल उपस्थित केला तुरळक स्वरूपाचा पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद करण्यात आले व ज्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातो तो शुद्ध नसतो त्यासाठी ५६ खेडी योजनेतून टँकर भरून देण्याची मागणी करण्यात आली  मुख्याधिकारी श्रिया देवचके यांनी पालिकेने पाणीपट्टीची पैसे अदा केल्यावर देखील जिल्हा परिषदेकडून उशिरा योजनेचे पाण्याचे आवर्तन उशिरा मिळते ते तीन दिवसांनी मिळावे अशी अपेक्ष व्यक्त केली  बैठकीत वीज वितरण विभागवावर अक्षरशः तकरींचा पाऊसच पडला त्यावर वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांची एकच भंबेरी उडाली मुद्रालोण चे प्रकाराने मार्गी लागत नसल्याचा मुद्दा नितीन पांडे यांनी उपस्थित केला एकूणच आजची आढाव बैठक वादळी व आरोपप्रत्यारोपात संपन्न झाली 

नांदगाव - खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीला वीज वितरणातील अधिकार्यांना उपस्थितांच्या प्रक्षोभाला सामोरे जाण्याचा प्रसंग उदभवला उप कार्यकारी अभियंता मधुकर साळुंकेव शिंदे यांच्यावर प्रश्नाची सरबत्ती झाली व्यासपीठावर प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार भारती सागरेमाजी आमदार संजय पवार, दत्तराज छाजेड आदी  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: पुनरागमन करताच मॅक्सवेलचा गुजरातला मोठा दणका! कर्णधार शुभमन गिलला धाडलं माघारी

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT