Dignitaries during the release of the introduction booklet at the bride meeting of the District Maratha Seva Sangh esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : अपेक्षांचे वाढलेले ओझे कमी करा! जिल्हा मराठा वधूवर परिचय मेळाव्यात मान्यवरांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

नवलनगर/कापडणे (जि. धुळे) : मुलीच्या जन्माचे स्वागत करावे. आजपासून चारशे वर्षांपूर्वी लखुजीराव जाधव यांनी जिजाऊंच्या जन्माच्या वेळेस सिंदखेडराजा परिसरामध्ये हत्तीवरून साखरेचे व मिठाईचे वाटप केले होते. आता आपल्या सर्वांमध्ये बदल होणार आहे किंवा नाही या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे.

मुलींचा कमी झालेला जन्मदर, वाढलेल्या अपेक्षा व नोकरी, उद्योग, व्यवसाय आणि शेतीत काम करणारे तरुण यामध्ये असंतुलित परिस्थिती निर्माण झाली आहे, ती सुधारण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा असे आवाहन विचारवंत डॉ. बालाजी जाधव (संभाजीनगर) यांनी व्यक्त केले. (Reduce the increased burden of expectations Calling dignitaries in district Maratha bride introduction gathering Dhule Ne)

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वधूवर सूचक कक्षाच्या माध्यमातून हिरे भवनात भव्य खानदेशस्तरिय वधूवर परिचय मेळावा झाला. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे होते. मेळाव्याचे उद्घाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते झाले.

वधू वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते झाले. माजी आमदार शरद पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील, महापौर प्रतिभा चौधरी, बाळासाहेब भदाणे, उद्योजक प्रकाश बाविस्कर, संतोषराव सूर्यवंशी, उद्योजक किशोर पाटील, प्रा.अरविंद जाधव, ॲड. डी. आर. पाटील, संजीवनी शिसोदे, साहेबराव देसाई, डॉ. सुशील महाजन, मीना देशमुख, प्रा. आर. ओ. निकम, डॉ. संजय पाटील, प्रा. टी. पी. शिंदे, डॉ. जगदीश देशमुख, शिवाजीराव मराठे, डॉ. योगेश सूर्यवंशी, कमलेश देवरे, डॉ. के. बी. पाटील, पत्रकार विलास पवार, अमोल पाटील, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

आमदार कुणाल पाटील म्हणाले, सर्वांनाच अनुरूप स्थळे हवेत. मात्र अपेक्षांचे ओझे थोडे कमी करून योग्य वयात विवाह करणे देखील आवश्यक आहे. खासदार भामरे म्हणाले, परंपरागत चालीरीतींना फाटा देऊन अनिष्ट रूढी परंपरा बंद करणे आवश्यक आहे.

विवाह सोहळ्यांवर होणारा अनाठायी खर्च कमी करणे आवश्यक आहे. उद्योजक प्रकाश पाटील, महापौर प्रतिभा चौधरी, डॉ. सुशील महाजन यांनी विवाहबाबत येणाऱ्या अडचणीत संबंधित आजच्या परिस्थितीचे जाणीव समाज बांधवांना करून दिली.

सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, वधूवर कक्षाचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, सचिव एच. ओ. पाटील, एस. एम. पाटील, डॉ. सुनील पवार, प्रा. बी. ए. पाटील, उमेश शिंदे, नूतन पाटील, डॉ. सुलभा कुवर, अथर्व बिरारीस, छाजेंद्र सोनवणे आदींनी संयोजन केले.

दीड हजार उपस्थित

मेळाव्यासाठी नऊशे वधूवरांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात एक हजार पाचशे इच्छुक उपस्थित होते. तीनशे सत्तर इच्छुक उपवरांनी परिचय करून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख - भूमिकन्यांचा सन्मान

हिवाळ्याची खास चव! घरी बनवा गरमागरम गुळाची पोळी, रेसिपी इतकी सोपी की लगेच नोट कराल

आजचे राशिभविष्य - 02 जानेवारी 2026

10th Pass Govt Jobs: दहावी पास असाल? मग ही दिल्लीतील सरकारी नोकरी चुकवू नका, लगेच करा येथे अर्ज

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT