Anup Agarwal, Alpa Agarwal performing aarti during the procession of Prabhu Shriram Murti,Magnificent Hanuman idol esakal
उत्तर महाराष्ट्र

Ram Lalla Pran Pratishtha : एकही नारा, एकही नाम ‘जय श्रीराम’

अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त धुळ्यात भाजपचे अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून शहरातील पांझरा नदीपात्रात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Ram Lalla Pran Pratishtha : अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त धुळ्यात भाजपचे अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून शहरातील पांझरा नदीपात्रात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. यानिमित्त ३१ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी (ता. २१) शहरातून श्रीराम मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली. ‘एक ही नारा... एक ही नाम... जय श्रीराम...जय श्रीराम...’चा घोष करीत हजारोंच्या संख्येने रामभक्त शोभायात्रेत सहभागी झाले. (replica of Shriram temple in Ayodhya erected in Panjra riverbed in Dhule on occasion of Pranpratistha ceremony of Shriram Murti in Ayodhya)

शोभायात्रेत भगवान श्रीरामाच्या विविध मूर्तींसह हनुमानची २१ फूट उंच मूर्ती, आदिवासी नृत्यपथक, ताशापथक, नृत्यपथक, ढोलपथक आदी पथके, डीजे, राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, नंदी, शंकरजी, शबरीमाता, नारदजी, गणपती, ऋषीमुनी यांचे सजीव देखावे यांचा समावेश होता. फेटाधारी-कलशधारी महिलांचा लक्षणीय सहभाग होता.

शोभायात्रेत श्रीराम भक्त-भाविकांसह तरुणाईने प्रचंड आतषबाजी केली. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी झाली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला.

तेथून महात्मा गांधी स्मारक, श्री स्वामी समर्थ मंदिरमार्गे पांझरा नदीकिनारी अयोध्यानगरी येथे समारोप झाला. श्री. अग्रवाल यांच्यासह खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे.

भाजप शहर-जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, शीतल नवले, जिल्हा परिषद सभापती हर्षवर्धन दहिते, चेतन मंडोरे.

कमलाकर अहिरराव, भिकन वराडे, महादेव परदेशी, ललित आरुजा, सचिन दहिते, संदीप अग्रवाल, सुनील चौधरी, सागर चौधरी, रोहित चांदोडे, जयेश माळी, सतीश महाले, राकेश कुलेवार, प्रवीण अग्रवाल, अजय अग्रवाल, जयश्री अहिरराव.

अल्पा अग्रवाल, महादेवी परदेशी, किरण कुलेवार, सारिका अग्रवाल, कविता नवले, वंदना थोरात, प्रीतम सूर्यवंशी आदींसह श्रीरामभक्त शोभायात्रेत सहभागी झाले.

‘माझे शहर-माझी आयोध्या’

पांझरा नदीपात्रात श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारतानाच ‘माझे शहर, माझी आयोध्या’ ही संकल्पना साकारत नगावबारीपासून थेट गुरुद्वारापर्यंत, मार्केट यार्ड परिसर, ऐंशी फुटी रोड, संतोषीमाता परिसर, स्टेशन रोड परिसर, नदीकाठचा परिसरासह शहरात सर्वत्र विविधरंगी रोषणाई करण्यात आली आहे.

अयोध्यानगरीत विविध कार्यक्रम

धुळेकरांना श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद मिळावा, यासाठी श्री. अग्रवाल यांच्या संकल्पनेतून पांझरा नदीपात्रात अयोध्या नगरी साकारण्यात आली आहे. या ठिकाणी श्रीराम मंदिराची ६० फूट उंच, ६५ फूट रुंद व ११० फूट लांब प्रतिकृती साकारली आहे.

३१ जानेवारीदरम्यान येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील ३७ कारसेवकांचा सत्कारही करण्यात येणार आहे. सोमवारी (ता. २२) दुपारी बाराला श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसाद.

रात्री आठला दीपोत्सव, साडेआठला लाइट शो व आतषबाजी, २३ जानेवारीला रात्री आठला रामदेवबाबा भजनी मंडळातर्फे भजनसंध्या कार्यक्रम होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT