New office bearer, Director of Small Industries Bharati taking responsibility resolution. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : लघुउद्योग भारती कार्यकारिणीचा ‘दायित्व संकल्प’; मान्यवरांची उपस्थिती

औद्योगिक संघटनेच्या धुळे शाखेचा वर्ष २०२४-२६ या द्विवर्षीय कार्यकालासाठी नवनियुक्त नूतन कार्यकारिणीचा ‘दायित्व संकल्प समारोह’ येथील हॉटेल गणपती पॅलेस येथे झाला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : उद्योग वृद्धी, उद्योजक हित व उद्योजकता विकास या त्रिसूत्रीसह राष्ट्रोद्धाराच्या ध्येयाने प्रेरित लघुउद्योग भारती या औद्योगिक संघटनेच्या धुळे शाखेचा वर्ष २०२४-२६ या द्विवर्षीय कार्यकालासाठी नवनियुक्त नूतन कार्यकारिणीचा ‘दायित्व संकल्प समारोह’ येथील हॉटेल गणपती पॅलेस येथे झाला.

लघुउद्योग भारतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे अध्यक्षस्थानी होते. (Responsibility Resolution of Small Industries Bharati Executive dhule news)

अधिष्ठापन अधिकारी व लघुउद्योग भारतीचे नाशिक विभागीय अध्यक्ष दिनेश लोढा, लेखक, उद्योजक, वक्ते तथा फॉर्च्यून ५०० उद्योगांचे फ्रीलान्स बिझनेस कोच केतन गावंड प्रमुख वक्ते होते. निवर्तमान अध्यक्ष राहुल कुलकर्णी, संजय देसले यांच्यासह लघुउद्योग भारतीचे उद्योजक सदस्य, शहरातील कारखानदार, व्यावसायिक, प्रमुख संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

नूतन कार्यकारिणी अशी ः अध्यक्ष- वर्धमान सिंगवी, उपाध्यक्ष- राजेंद्र जाखडी व महेश नावरकर, कोशाध्यक्ष- भूषण अमृते, मंत्री- उमेश अग्रवाल, सहमंत्री- कपिल सराफ, सह-कोशाध्यक्ष- रोहित अग्रवाल. दरम्यान, विविध विभागांचे दायित्व या संचालक सदस्यांना देण्यात आले. यात मनोज ताथेड (जमीन व मालमत्ता), सीए विष्णू अग्रवाल (वित्त व बँकिंग), संजय विसपुते (औद्योगिक सुरक्षा),

महेश कुलकर्णी (उद्योजकता विकास), आशिष कुलकर्णी (प्रदूषण नियंत्रण), माणिक वाणी (आयात व निर्यात), भरत पाटील (ऊर्जा), हकीम मालक (एमएसएमइ), सौरभ जोशी (पायाभूत सुविधा), सीताराम अग्रवाल (सामाजिक बांधीलकी), राजेंद्र खंडेलवाल (संयोजन), संतोष पाटील (सदस्यता वृद्धी), विनीत जैन (जनसंपर्क).

तसेच नूतन कार्यकारिणीत राजेश भतवाल, राहुल कुलकर्णी, सुभाष कांकरिया व राजेश वाणी सल्लागार, तर सीए श्रीराम देशपांडे (स्टार्टअप प्रोत्साहन), सीए गोवर्धन मोदी (औद्योगिक धोरणे व योजना), सीए राहुल मुंदडा (प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर) व अॅड. अनिश शाह (कामगार कायदे) यांचा समावेश आहे.

गावंड यांचे व्याख्यान

दरम्यान, या कार्यक्रमानिमित्त मुंबई येथील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय प्रेरक वक्ता केतन गावंड यांचे ‘रिसेट-माइंडसेट’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी व्यक्तिमत्त्व विकास, व्यवसायातील नेमके यश आणि सफलता यावर मार्गदर्शन केले. श्री. सोनवणे यांनीही मार्गदर्शन केले. कल्याणी कचवाह, दीपाली जोशी यांनी सूत्रसंचालन केले. उमेश अग्रवाल यांनी आभार मानले. अधिष्ठापन अधिकारी लोढा यांनी नूतन पदाधिकारी, संचालकांना प्रतिज्ञा दिली.

उद्योजकीय चिकित्सालय

नूतन अध्यक्ष सिंगवी यांनी आगामी द्विवर्षीय कार्यकाळात उद्योजकांसाठी अधिकाधिक गुणात्मक व रचनात्मक कार्य करण्याचा सदस्यसंख्येत वाढ करून संख्यात्मक वृद्धी करण्यचा मानस याप्रसंगी व्यक्त केला. दरम्यान, उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडविणे, उद्योगांच्या सर्वंकष विकासासाठी लघुउद्योग भारतीमार्फत ‘उद्योजकीय चिकित्सालय’ (Enterprenural Clinic)चे या वेळी औपचारिक उद्‌घाटन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT