Prepared rice plants.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Agriculture News : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भातलागवडीस प्रारंभ; चिखलणी करून भातरोपणी

सकाळ वृत्तसेवा

Dhule Agriculture News : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात दमदार पाऊस झाल्याने भातरोपणीला सुरवात झाली असून, चिखलणी करून भातरोपणी करताना शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.

पश्चिम पट्ट्यात भातशेती केली जाते. कोकणाप्रमाणेच या भागातही आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने भात शेती करीत आहे. भातशेतीसाठी पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील भौगोलिक वातावरण अनुकूल असल्याने येथील तांदळाला सर्वाधिक मागणी असते. (Rice cultivation started in western belt of Pimpalner dhule agriculture news)

रोपणी भातासाठी अगोदर जमिनीवर छोटे-छोटे वाफे करून त्यात काडीकचरा गोळा करून जमिनीची भाजणी करून त्या ठिकाणी भाताची रोपे टाकली जातात व ती मोठी झाल्यावर जमीन तयार करतात.

प्रथम भात ज्या ठिकाणी लावायचा त्या जागेला चहुबाजूने मातीचा उंच बांध बांधून घेतात व तेथे पावसाचे पाणी साचल्यानंतर चिखलणी करतात. त्यानंतर त्या ठिकाणी भातरोपणी करतात. ते काम सध्या शेतकऱ्यांनी सुरू केले आहे.

जास्त पाण्याची गरज

भातलागवडीस जास्त पाण्याची गरज असल्याने पाणी साचविले जाते. त्या शेतीत पाण्यात नांगरणी करून पाटी फिरविली जाते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नंतर पाण्यात भाताची रोपे लावली जातात.

या वाणाली अधिक पसंती

इंद्रायणी, सुकवेल, चिमणसाळ बासमती, खुशबू, भोवाड्या, डावाड्या, रूपाली यांच्यासह अनेक विविध जातीचे भाताचे वाण उपलब्ध आहे. पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील सगळ्यात जास्त पिकविला व विकला जाणारा तांदूळ इंद्रायणी असल्याने इंद्रायणी भाताचे सर्वाधिक क्षेत्र दिसून येत आहे.

पिंपळनेर, वार्सा, दहिवेल येथे भरणाऱ्या आठवडे बाजारात पश्चिम पट्ट्यातील चांगल्या प्रतीचा गावरान तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध असतो. तांदळाचा सगळ्यात मोठा बाजार पिंपळनेर येथे शुक्रवारी गांधी चौकात असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात तांदूळ विक्रीसाठी आणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Oil Deal: भारतासाठी मोठी खुशखबर! रिफायनरी कंपन्यांना दिलासा, रशियन तेल मिळणार 5 टक्के सवलतीत

Asia Cup 2025 साठी निवड होताच रिंकू सिंग उतरला, पण २० वर्षांच्या गोलंदाजाकडूनच झाला क्लिनबोल्ड; पाहा Video

Rain-Maharashtra Latest Live News Update: मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

Shocking : रोहित शर्मा, विराट कोहली यांची ODI मधून निवृत्ती? ICC ने चाहत्यांना दिला धक्का; नेमकं काय घडलं ते वाचा

Mahabaleshwar News: महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली; २४ तासांत १७३ मिलिमीटर (७ इंच) पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT