Vehicles blocked by mob blocking road after riots.
Vehicles blocked by mob blocking road after riots.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Riot News : सांगवीत बॅनर फाडल्यावरून दंगल; रास्ता रोकोवेळी आमदार, तहसीलदारांसह एलसीबीचे वाहन फोडले

सकाळ वृत्तसेवा

Dhule Riot News : सांगवी (ता. शिरपूर) येथे बॅनर फाडल्याच्या वादातून दोन गटात गुरुवारी (ता. १०) दुपारी तुफान दंगल उसळली. त्यात अनेक जण जखमी झाले असून तिघांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर सांगवी गाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावण्यात आला. या घटनेचा सायंकाळनंतर पुन्हा उद्रेक झाला. त्यात एक हजारावर संख्येच्या हिंसक जमावाने रास्ता रोकोतून रात्री दहानंतरही महामार्ग रोखून धरल्याने स्थिती चिघळली. (Riots over banner tearing in Sangvi shirpur dhule news)

जमावाची समजूत काढण्यासाठी गेलेले शिरपूरचे आमदार काशिराम पावरा, तहसीलदार महेंद्र माळी यांच्या वाहनावर जमावाने दगडफेक करीत नुकसान केले. या घटनेत तहसीलदारांच्या वाहनावरील चालक आरिफ शेख जखमी झाले. नंतर स्थिती नियंत्रणासाठी प्रयत्नशील

एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्याही वाहनाचा जमावाने काच फोडला. त्यात काही पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. रात्री दहानंतरही तणावाची स्थिती कायम होती. शिवाय महामार्ग जमावाने रोखून धरल्याने दुतर्फा वाहतुकीची कोंडी झाली.

जमावाने अंधाराचा फायदा घेत आणि त्यात मोठ्या प्रमाणावर दगड गोळा करून आणत हिंसक मार्ग अवलंबला. दगडफेकीतून जमाव हा पोलिसांनाही आसपास येऊ देत नसल्याने गंभीर स्थिती घटनास्थळी होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आदिवासी दिनानिमित्त सांगवी गावात महापुरुषांना अभिवादनपर फलक लावण्यात आले होते. यात गुरुवारी दुपारी त्यातील एक बॅनर फाडल्याची माहिती आदिवासी वस्तीत कळताच तणाव पसरला. या घटनेला जबाबदार असल्याचा एकमेकांवर आरोप करीत दोन गटांत दंगल उसळली. दगडफेकीसह काठ्यांचा वापर झाल्याने दोन्ही गटातील काही जण जखमी झाले.

पैकी सुभाष विजय सोनवणे (वय २६), नितीन लक्ष्मण भिल (वय १८) व शिवदास आसाराम भिल (वय ४०, तिघे रा. सांगवी) यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दंगलीनंतर जमावाने मुंबई- आग्रा महामार्गावर रास्ता रोको करून वाहतूक रोखून धरली.

दंगलीचे वृत्त कळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे आणि फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. धुळे मुख्यालयातूनही फौजफाटा मागविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत पोलिस स्थिती नियंत्रणासाठी तळ ठोकून होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Accident: नागपुरात आणखी एक कार अपघात! अल्पवयीन कार चालकाने पाच जणांना उडवलं, अल्पवयीन कारचालकासह...

Shubman Gill : दोस्त दोस्त ना रहा... गिलने कर्णधार रोहितला केलं अनफॉलो, मोठं कारण आलं समोर

Rudraprayag Accident: एक डुलकी अन् क्षणात बस कोसळली दरीत...१४ जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Stock Market Exit Polls : ‘एक्झिट पोल’च्या परिणामाची चौकशी करा;तृणमूलची मागणी,शिष्टमंडळ सेबी अध्यक्षांना भेटणार

Weather Update : पावसाचा हायअलर्ट! राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT