Private punter Ritesh Pawar 
उत्तर महाराष्ट्र

Dhule Bribe Crime : ‘तहसील’मधील खासगी पंटर रितेश ‘एसीबी’च्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Dhule Bribe Crime : शिंदखेडा तहसील कार्यालयातील खासगी पंटर रितेश अरुण पवार याला मंगळवारी (ता. १०) दुपारी १४ हजारांची लाच घेताना शिंदखेडा येथील पाटण रस्त्यावरील पेट्रोलपंपाजवळ रंगेहाथ पकडण्यात आले.

धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कारवाई केली. शिंदखेडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू होते. (Ritesh pawar arrested in bribe crime dhule news)

डांगुर्णे येथील तक्रारदार यांच्या मालकीची गावशिवारात शेतजमीन आहे. शेतजमिनीचे खातेफोड करण्यासाठी तक्रारदार तहसील कार्यालयात कागदपत्रे घेऊन आले असता खासगी पंटर रितेश पवार याच्याशी भेट झाली. खातेफोड करून देण्यासाठी तक्रारदार व सहधारक यांना ४ ऑक्टोबरला बोलावले.

खातेफोड प्रकरणाचे कामकाज करून दिले. कार्यालयातील नायब तहसीलदार, अधिकारी व कर्मचारी यांच्याशी माझे घनिष्ठ संबंध आहेत. तहसीलदार यांचा आदेश काढण्यासाठी २० हजारांची मागणी केली.

तक्रारीच्या अनुषंगाने ६ ऑक्टोबरला शिंदखेडा तहसील कार्यालयात जाऊन पडताळणी केली असता तडजोडीअंती १४ हजार रुपयांची मागणी केली. शिंदखेडा येथे मंगळवारी पंचांसमक्ष १४ हजार रुपयांची लाच घेताना रितेश रंगेहाथ मिळून आला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे शाखेचे उपअधीक्षक अभिषेक पाटील, निरीक्षक मनजितसिंह चव्हाण, हेमंत बेंडाळे, रूपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागूल, गायत्री पाटील, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कामगिरी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 1st ODI : यशस्वी जैस्वाल OUT, रिषभ पंतला स्थान नाही! हर्षित राणा खेळणार; पहिल्या वन डे साठी Playing XI अशी असणार...

Ambarnath Election: अंबरनाथमध्ये शिंदेंनी भाजपचं स्वप्न धुळीस मिळवलं; काँग्रेसला सोबत घेतलेल्या भाजपचं काय?

Tribal Development Scam : आदिवासी विकास निधीवर डल्ला; घोडेगावमध्ये ३१ लाखांच्या शासकीय निधी अपहारप्रकरणी गुन्हा दाखल!

Budget Session 2026: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारी पासून सुरू होणार; तारखा जाहीर

Winter Hot Shower Risks: आरामदायक वाटणारी गरम पाण्याची आंघोळ तुमची त्वचा हळूहळू खराब करतेय का? तज्ज्ञांनी सांगितले धोके

SCROLL FOR NEXT