Farmers malhari cloths while turning a rotavator on a vertical papaya plantation. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Agriculture News : मोझॅकमुळे उभ्या पपईवर फिरविला रोटव्हेटर; शेतकऱ्याचा लाखो रुपयांचा खर्च वाया

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Agriculture News : पपईवर मोठ्या प्रमाणावर मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याने लाखो रुपये खर्च करूनही उत्पादनाची शाश्वती नसल्याने कंटाळलेल्या शेतकऱ्याने अखेर उभ्या पपईबागेवर रोटाव्हेटर फिरविला. कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची अपेक्षा मात्र कायम आहे.

या वर्षी दुष्काळी परिस्थितीत मोठ्या मेहनतीने जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांनी पपई बागा जगविल्या. ()

राज्यात सर्वाधिक पपईची लागवड जिल्ह्यात आहे. त्यात शहादा तालुक्यात सर्वाधिक चार हजार ३०० हेक्टरवर पपई लागवड आहे. मात्र मोझॅक व्हायरसमुळे जिल्ह्यात जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्रातील पपईबागा प्रभावित झाल्या आहेत. तीन महिन्यांत बागांवर मोठ्या प्रमाणात फवारणी करून प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकऱ्यांनी बागांवर रोटाव्हेटर फिरवायला सुरवात केली आहे.

सर्वाधिक पपई उत्पादन

देशातील सर्वांत मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख असून, जिल्ह्यात जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे. त्यांपैकी तीन हजारांपेक्षा अधिक क्षेत्रावर मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून बागा वाचविण्यासाठी महागड्या औषधींची शेतकरी फवारणी करीत होते. मात्र उपयोग होत नसल्याने आता शेतकऱ्यांनी पपईबागांवर रोटाव्हेटर फिरविण्यास सुरवात केली आहे.

पपई लागवडीवर खर्च केलेला लाखो रुपयांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पपई उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नंदुरबार जिल्ह्यात पपई संशोधन केंद्र सुरू करावे, त्यासोबत मोझॅक व्हायरसमुळे नुकसान झालेल्या पपई उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

''दोन एकर क्षेत्रात पपई लागवड केली आहे. १६ रुपये दराने रोप खरेदी करून दोन एकर क्षेत्रात दोन हजार झाडांची लागवड केली. पाच महिने मेहनत घेतली. दीड लाखापर्यंत खर्चही केला; परंतु मोझॅक व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अपेक्षित फळधारणा झाली नाही. पाच ते सहा लाख रुपये उत्पादन येणे अपेक्षित असतानाच व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे झाडाची छत्री व पानेही गेल्याने उत्पादनाची शाश्वती नसल्यानेच उभ्या पपईबागांवर रोटाव्हेटर फिरविण्याच्या कटू निर्णय घेतला.''-मल्हारी कापडे,शेतकरी, ब्राह्मणपुरी, ता. शहादा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Road Traffic Jam : पुण्यातील सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, ऑफिसच्या दिशेने निघालेल्यांना मनस्ताप

Kolhapur Accident Video : कोल्हापूरमध्ये मद्यपी ट्रॅक्टर चालकाने वृद्ध महिलेला उडवलं; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरच्या भांडेवाडी परिसरात आढळला बिबट्या, वनविभागाच्या वेगवेगळ्या रेस्क्यू सुरु

MPSC Success : संघर्ष ते यशाचे शिखर! सायकलवर भंगार गोळा करणाऱ्या वडिलांच्या कन्येची MPSC त राज्यात पहिली झेप

Mumbai CNG Shortage: सीएनजी कोंडीतून मुंबईकरांची सुटका, पुरवठा सुरळीत होताच पंपांवर गर्दी; ३ दिवसात कोट्यवधींचं नुकसान

SCROLL FOR NEXT