Archive photo of Marathon 2023 esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Marathon 2024 : धुळ्यात 4 फेब्रुवारीला `रन फॉर पांझरा`; नीटनेटके आयोजन

जिल्ह्यात न भूतो न भविष्य आणि धुळेकरांमध्ये दडलेली अभिरुची प्रकाशात आणणारा धुळे मॅरेथॉन-२०२३ चा पहिला उपक्रम अद्याप कुणाच्याही विस्मरणात गेलेला नाही.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Marathon 2024 : जिल्ह्यात न भूतो न भविष्य आणि धुळेकरांमध्ये दडलेली अभिरुची प्रकाशात आणणारा धुळे मॅरेथॉन-२०२३ चा पहिला उपक्रम अद्याप कुणाच्याही विस्मरणात गेलेला नाही.

बोलता बोलता वर्ष सरले आणि यंदा धुळे मॅरेथॉन २०२४ होणार की नाही, अशी धुळेकरांची शिगेला पोचलेली उत्सुकता पूर्णत्वास नेण्यासाठी आयोजकांनी पूर्वतयारी सुरू केली आहे.(Run for Panjra on February 4 in Dhule marathon 2024 news)

त्यानुसार ‘फिट धुळे, हिट धुळे’ हे मॅरेथॉनचे घोषवाक्य, तर धावपटू `रन फॉर पांझरा` ही थीम साकारण्यासाठी धावतील. मॅरेथॉनच्या माध्यामातून पांझरा नदीचे स्वच्छतेसह बंधारे साकारून सौंदर्यकीकरण खुलावे, असा जनसंदेशात्मक प्रयत्न असेल.

जिल्ह्यात न भूतो न भविष्यती, असा एक धुळे मॅरेथॉन-२०२३ हा पहिला उपक्रम राबविला गेला होता. मॅरेथॉनला केवळ पाच ते दहा हजार स्पर्धक धुळेकरांचा प्रतिसाद अपेक्षित असताना तो थेट पाच ते सहा पटीने लाभल्याने अभूतपूर्व असे यश मिळाले. मॅरेथॉनचा संबंध मार्ग आणि पोलिस कवायत मैदान एकूण ३५ हजारांवर धुळेकरांसह राज्यातील धावपटूंच्या जल्लोषाने दणाणला होता.

त्यामुळेच या स्पर्धेनंतरचे कवित्व अजूनही गायले जात असते. गेल्या वर्षाप्रमाणे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालय आणि मीडिया पार्टनर `सकाळ माध्यम समूहा`च्या साथीने यंदा ही स्पर्धा होईल.

चार फेब्रुवारीला मॅरेथॉन

स्पर्धेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक झाली. जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या समावेशाची प्रमुख समिती आहे.

याअंतर्गत एक्झिक्युटिव्ह वर्किंग कमिटीत अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी, महापालिकेच्या उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश टिळे, अशासकीय सदस्य आशिष अजमेरा.

आशिष पटवारी, दीपक अहिरे, संग्राम लिमये, निखिल सूर्यवंशी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे, गृहशाखेचे उपअधीक्षक तथा सायबर सेलचे पोलिस निरीक्षक धनंजय पाटील, नोडल अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक पंडित सोनवणे यांचा समावेश आहे.

फायनान्स, मेडल यासह विविध समित्यांची स्थापना व त्यातील सदस्यांची निवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी केवळ पंधरा दिवसांच्या अवधीत नियोजन करण्यात आले होते. यंदा तयारीसाठी मोठा अवधी मिळत असल्याने नियोजनावर समित्यांकडून भर दिला जाणार आहे.

तोच मार्ग, बक्षिसामध्ये वाढ

सर्व जाती- धर्मात खेळीमेळीचे, एकोप्याचे वातावरण निर्माण करण्याची ताकद क्रीडा प्रकारात असते. ते धुळे मॅरेथॉन स्पर्धेने सिद्ध केले. त्यामुळे सकारात्मक विचारांसह अभूतपूर्व चैतन्याची लाट गेल्यावेळी अनुभवास मिळाली. गेल्यावर्षी पाच फेब्रुवारीला रविवारी मॅरेथॉन स्पर्धा होती. यंदा चार फेब्रुवारीला पोलिस कवायत मैदानापासून रविवारी (४ फेब्रुवारी) धुळे मॅरेथॉन (सीझन २) स्पर्धा होईल.

गेल्या वर्षाप्रमाणे तो यंदाही लोकोत्सवच ठरेल, असा आयोजकांना विश्‍वास आहे. यंदाही विजेत्यांवर अधिकाधिक रकमेच्या बक्षीसांचा वर्षाव होईल. आयोजकांकडून लवकरच ऑनलाइन नोंदणीसाठी लिंक, ऑफलाइन नोंदणीची व्यवस्था जाहीर करण्यात येईल. यंदा स्पर्धेत थोडे बदल असतील. नोंदणीसाठी अत्यल्प शुल्क व लाभ आणि मोफत सुविधेची माहिती लवकर जाहीर केली जाईल.

गेल्या स्पर्धेस शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर एसव्हीकेएम, इंदूबाई भदाणे प्रतिष्ठान (बोरकुंड, ता. धुळे), रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड, एस. कांतिलाल ज्वेलर्स, ब्लॅक ओॲसिस टूर ॲन्ड ट्रॅव्हल्स, ऑटोमोबाईल असोसिएशनसह अन्य दानशूरांच्या पाठबळाने विनामूल्य मेडल, नाश्ता बॉक्स, एनर्जी ड्रिंक, पाणी बॉटल मोफत दिल्या गेल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT