SAKAL Impact esakal
उत्तर महाराष्ट्र

SAKAL Impact : अखेर ‘त्या’ निर्लेखित खोल्या पाडण्याचे आदेश! जिल्ह्यातील 108 खोल्या धोकादायक

दोन वर्षांपासून धोकादायक झालेल्या इमारतींचा विषय नव्या वर्षाच्या प्रारंभीच निकाली निघणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

कापडणे : धुळे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या १०३ आणि जिल्ह्यातील पाच अशा १०८ खोल्या मोठ्या प्रमाणात जीर्ण झाल्या आहेत. त्या निर्लेखित करण्यात आल्या आहेत. त्यांना पाडण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी काढले आहेत.

संबंधित तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांना तसे सूचित करण्यात आले आहे. दोन वर्षांपासून धोकादायक झालेल्या इमारतींचा विषय नव्या वर्षाच्या प्रारंभीच निकाली निघणार आहे. (SAKAL Impact Finally order to demolish those unlisted rooms 108 rooms in district are dangerous dhule)

धनूर : निर्लेखित खोल्या पाडण्याचे आदेश निघाल्याने जिल्हा परिषद शाळेची ही धोकादायक खोली लवकरच पाडली जाईल, बातमीचे कात्रण.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या निर्लेखित केलेल्या खोल्या धोकादायक अवस्थेत असल्याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. याची जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ दखल घेतली.

मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांनी निर्लेखित खोल्या पाडण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. यात एकूण १०८ खोल्या पाडल्या जाणार आहेत.

गावनिहाय शाळा व पाडण्यात येणाऱ्या खोल्यांची संख्या अशी ः धनूर- १, महालरावट नेर- १, नवलाणे- ४, सुकवड- १, कुंडाणे- ५, वरखेडे- ८, चिंचखेडे- ९, मोराणे-५, आंबोडे- ४, आमदड- २, अंचाडे- १, अंचाडेताडे- १, काळखेडे- ५, वडजाई- २, शिरूड- २१, गरताड- १, धाडरी- १, जुन्नेर- २, मळाणे- २, उभंड- ५, नंदाळे- १, हेंकळवाडी- १, पिंप्री- १, आर्वी- १, मोघण- १, सुट्रेपाडा- १, बोरविहीर- ६, रानमळा- ४, मोरदडतांडा- १, शिरडाणे प्र.डा.- ४, भिरडाणे-२, पाडळदे- १ आदी.

"धनूर शाळेची खोली धोकादायक झाली आहे. ‘सकाळ’मधील वृत्ताची तत्काळ दखल घेतल्याने समाधान वाटत आहे. सकाळची विधायक पत्रकारितेची परंपरा अबाधित आहे."

-चेतन शिंदे, लोकनियुक्त सरपंच, धनूर-लोणकुटे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! केवायसीनंतर अनेक ‘लाडक्या बहिणी’ अपात्र; गोरगरीब महिलांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ, शासन करतय काय?

अग्रलेख - विवेकी स्वर लोपला

आजचे राशिभविष्य - 09 जानेवारी 2026

Egg Paratha Recipe: ब्रेकफास्टसाठी हेल्दी काहीतरी खास हवंय? 15 मिनिटांत तयार होणारा ‘अंडा पराठा’ ट्राय करा

३० लाख लाडक्या बहिणी चिंतेत! ‘ई-केवायसी’ची मुदत संपली, आता लाभ बंद होणार; १ एप्रिलपासून ‘या’ लाडक्या बहिणींनाच दरमहा मिळणार लाभ

SCROLL FOR NEXT