Asphalting near Vindhyavasini Mata Temple, In the second photograph, the changed face of 'T Point' area. esakal
उत्तर महाराष्ट्र

SAKAL Impact : विंध्यवासिनी मंदिर परिसर, ‘टी पॉइंट’वर डांबरीकरण

शहरातील विंध्यवासिनी माता मंदिर परिसर व कळमोदा रस्त्यावरील ‘टी पॉइंट’वर खासदार निधी अंतर्गत डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील विंध्यवासिनी माता मंदिर परिसर व कळमोदा रस्त्यावरील ‘टी पॉइंट’वर खासदार निधी अंतर्गत डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. शिवाय, या दोन्ही ठिकाणचा चेहरामोहरा बदलला असून, ‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश आले आहे.

शहराच्या उत्तरेस न्हावी दरवाजाजवळ सुवर्णकार समाजाचे विंध्यवासिनी माता मंदिर आहे. या मंदिरासमोर गेल्या काही वर्षांपासून मोठमोठे खड्डे पडल्याने मंदिरा समोरील भाग पूर्णपणे खड्डेमय झाला होता. (sakal impact on Asphalting at T Point Vindhyavasini Temple premises jalgaon news)

शहरातील इतर भागाप्रमाणे येथे पेव्हर ब्लॉक बसविण्याची नागरिकांची अपेक्षा होती. या विषयी ‘सकाळ’ने सचित्र वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यानंतर पालिकेने सभेत ठराव मंजूर केला.

मात्र, ठराव ते प्रशासकीय मंजुरीसाठी केलेले प्रयत्न असफल ठरले. टी पॉइंटवर सर्व बाजूने पावसाळ्यात साचणारे पाणी, घाणीचे साम्राज्य, खड्डे यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. ही दोन्ही ठिकाणे विकसित व्हावी.

याविषयी ‘सकाळ’ने पाठपुरावा केला. सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांनी लक्ष केंद्रित करून विंध्यवासिनी माता मंदिर परिसर रस्ता व कळमोदा रस्त्यावरील टी पॉइंट विकसित व्हावे, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे केल्यानंतर या दोन्ही ठिकाणी खासदार निधीअंतर्गत डांबरीकरण करण्यात आले असून, या दोन्ही ठिकाणचा चेहरामोहरा बदलला आहे.

शिवाय टी पॉइंटवर होणाऱ्या घाणीचे साम्राज्याचे समूळ उच्चाटन होऊन सौंदर्यात भर पडली आहे व टी पॉइंट परिसरातील नागरिकांना ये-जा करणे सोयीचे झाले आहे. दरम्यान, टी पॉइंट’च्या मधोमध गटारीचा भाग असल्याने आता त्यातील सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी पालिकेने गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी पुढे आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT