Ongoing work of removing thorn bushes on both sides of the road between Kukaval-Kalambu-Sarangkheda. esakal
उत्तर महाराष्ट्र

SAKAL Impact : सारंगखेडा-कुकावल रस्त्यावरील काटेरी झुडपे काढण्यास सुरवात; ‘सकाळ’मधील वृत्ताची दखल

Nandurbar News : सकाळ’ने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेत रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे हटविण्याचे काम हाती घेतल्याने, याचा वाहनधारकांना काहीशा प्रमाणात का असेना दिलासा मिळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

कळंबू : सारंगखेडा-कळंबू ते कुकावल या सहा किलोमीटर अंतरादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे व रस्त्याची चाळण झाली आहे, याबाबत ‘सकाळ’ने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेत रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे हटविण्याचे काम हाती घेतल्याने, याचा वाहनधारकांना काहीशा प्रमाणात का असेना दिलासा मिळणार आहे. (Removal of thorn bushes on Sarangkheda Kukawal road)

३० मेस कळंबू ते सारगखेडादरम्यान एसटी बस व दुचाकीच्या अपघातात कळंबू येथील राजेंद्र देवरे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेली पत्नी व नात गंभीर जखमी झाले. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे व रस्त्याची दुरवस्था यामुळे अपघात झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला होता.

याआधीही ‘सकाळ’ने याबाबत वेळोवेळी आपली भूमिका मांडून संबंधितांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. शुक्रवारी (ता. ७) संबंधित विभागाने दखल घेऊन काटेरी झुडपे काढण्याचे काम हाती घेतल्याने नागरिक व वाहनधारकांनी ‘सकाळ’चे आभार मानले. (latest marathi news)

रस्त्यावरील खड्डे ‘जैसे थे’

येथील रस्त्यावरील खड्ड्यांची अवस्था ‘जैसे थे’ आहे. यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाल्याने, वाहनधारक वैतागले आहेत. याची संबंधितांनी पावसाळ्यापूर्वी दखल घेऊन रस्त्यावरील खड्डे दर्जेदार दुरुस्ती करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT