NCP and bjp party esakal
उत्तर महाराष्ट्र

Sakal Survey : उलथापालथ ‘राष्ट्रवादी’त, धाकधूक भाजपमध्ये!

भारती पवार विरुद्घ नितीन पवार

राहुल रनाळकर

Sakal Survey - भारतीय जनता पक्षाला लोकसभेत निर्विवाद यश मिळवायचे आहे, त्यासाठी महाराष्ट्राची भूमिका मोठी आहे. लोकसभेसाठी सगळीच स्थिती मात्र अजित पवार यांच्या राज्य सरकारमधील समावेशाने आलबेल आहे, असे मानण्याचे कारण नाही. नाशिक आणि दिंडोरी लोकसभेचा विचार करता सध्या भाजपची स्थिती कमकुवत आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे (शिंदे गट) आहे. निवडून येण्याची क्षमता हा विचार केला, तर शिंदे गटाकडे ही जागा राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे जागा सोडायची झाल्यास कुठल्या अटी-शर्तींवर जागा भाजपकडे जाईल, हे अद्याप स्पष्ट नाही. ही जागा भाजपकडे गेल्यास मराठा प्रबळ उमेदवाराचा विचार पक्षाला करावा लागेल.

दिनकर पाटील हे सध्या भाजपकडील सर्वांत प्रबळ नेते आहेत. मात्र दिनकर पाटील यांना मदत करण्यासाठी छगन भुजबळ तयार होतील का, हा प्रश्न आहे. या सगळ्या उलथापालथींमध्ये शरद पवार यांचे लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघाकडे निश्चितपणाने राहणार असल्याचे संकेत येवल्यातील सभेतून मिळाले आहेत.

भारती पवार विरुद्घ नितीन पवार

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची वाट सोपी नव्हती. त्यात आता कळवण-सुरगाण्याचे आमदार नितीन पवार हे अजित पवार यांच्या गटात दाखल झाले आहेत. दिंडोरी लोकसभेसाठी पवार विरुद्ध पवार असे चित्र राहण्याची शक्यता आहे.

विद्यमानांना धाकधूक

खुद्द छगन भुजबळ यांच्याविरुद्धची लॉबी येवल्यामध्ये सक्रिय होऊ लागली आहे. ज्या अमृता पवार यांनी अलीकडेच भाजपत प्रवेश केला, त्या येवल्यातून भुजबळांविरुद्ध लढण्याची तयारी करत होत्या. महत्त्वाचे म्हणजे नीलिमाताई पवार यांचे कुटुंब भुजबळांविरुद्ध आक्रमक झाले होते. दिंडोरीत श्रीराम शेटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास नरहरी झिरवाळ यांना जागा वाचवणे कठीण जाईल.

नंदुरबारमध्ये भाजप निश्चिंत

धुळे आणि नंदुरबार लोकसभा सध्या भाजपकडे आहेत. अजित पवार गटाचे विशेष प्राबल्य नसल्याने नंदुरबारमध्ये भाजप निश्चिंत आहे. धुळे आणि मालेगावातील मुस्लिमबहुल भागातील मते नेहमीच निर्णायक ठरतात.

‘राष्ट्रवादी’कडे उमेदवार नसला तरी बदलत्या समीकरणांमध्ये भाजपसाठी येथे डोकेदुखी ठरू शकते. भाजपकडील जळगाव व रावेर या दोन्ही मतदारसंघांत उमेदवार बदल होण्याची शक्यता आहे. रावेरमध्ये सध्या एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे खासदार असून, जळगावमध्ये उन्मेष पाटील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral video : धावत्या एसटी बसमध्ये मद्यधुंद कंडक्टरचा राडा, ड्रायव्हरने बस थांबवली अन्... व्हिडिओ व्हायरल

Rain-Maharashtra Latest Live News Update: गेल्या २४ तासांत घाट क्षेत्र आणि उत्तर कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद

Sickle Cell Patients in Crisis: सिकलसेल रुग्ण संकटात; डागा रुग्णालयात हायड्रॉक्सीयुरियाचा तुटवडा, उपचाराऐवजी रुग्णांना दाराबाहेर

Women’s World Cup 2025: 'शेफाली वर्माला महिला संघातून वगळले'; विश्‍वकरंडकासाठी भारताचा संघ जाहीर, रेणुका सिंगचा समावेश

Mata Lakshmi: माता लक्ष्मी रात्री 'या' ठिकाणी करते भ्रमण, वाचा धार्मिक महत्व

SCROLL FOR NEXT