Residential photo
Residential photo 
उत्तर महाराष्ट्र

मद्यदुकानाचे काऊंटर जाळणाऱ्यास सक्तमजुरीची शिक्षा 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकरोड परिसरातील मद्यविक्री दुकानातून बळजबरीने मद्याच्या बाटल्या घेऊन, काऊंटरवर पेट्रोल टाकून ते जाळले. याप्रकरणी आरोपी ईलीयास गुलाब शेख (29, रा. सुंदरनगर, देवळाली गाव, नाशिकरोड) यास प्रधान जिल्हा न्यायालयाने सहा महिने सक्तमजुरी व 3 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सदरची घटना गेल्या फेब्रुवारी 2018 मध्ये घडली होती. 

मनोहर जयसिंघानी (रा. नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे सुभाषरोडवर जयसिघांनी ब्रॅंन्डी हाऊस हे मद्यविक्रीचे दुकान आहे. 17 फेब्रुवारी 18 रोजी आरोपी ईलियास शेख दुकानात आला आणि त्याने पैसे न देता बळजबरीने दोन बिअरच्या बाटल्या घेतल्या. यावेळी त्याने जयसिंघानी यांच्याकडे त्यांच्या मुलगा राजेशची विचारणा करीत त्यास जाळायचे असल्याचे म्हणाला आणि, शिवीगाळ करीत बाटलीतून आणलेले पेट्रोल दुकानाच्या काऊंटरवर टाकून ते जाळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए.टी. दळवी यांनी केला आणि दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात सादर केले. 
त्यानुसार, सदरचा खटला प्रधान जिल्हा व सत्र न्यायधीश आर. एम. जोशी यांच्यासमोर चालला. सरकारी पक्षातर्फे ऍड. शिरिष कडवे यांनी कामकाज पाहताना 10 साक्षीदार तपासले. पुरावे सिद्‌ध झाल्याने प्रधान न्यायधीश जोशी यांनी आरोपी ईलियास शेख यास 6 महिने सक्तमजुरी आणि 3 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हरून हवालदार के. एस. दळवी, एस.सी. शिंदे, एस.यु. गोसावी यांनी पाठपुरावा केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT