Residencial Photo
Residencial Photo 
उत्तर महाराष्ट्र

विकासकामे दाखविण्याची आमदारांची धडपड

सकाळ वृत्तसेवा

नाशिक, ता. 14- गेल्या काही दिवसात शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामांचा धडाका लावला जात असून त्यात विद्यमान आमदारांसोबतचं विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे होत असल्याचे दाखविले जात आहे परंतू ज्या विकासकामांचे उदघाटन केले जात आहे त्या कामाचे कार्यारंभ आदेश मिळाले नसतानाही उदघाटन करण्यात आल्याने निवडणुकीत ती कामे वादात सापडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या विषयावर कॉंग्रेसने आक्षेप घेतला असून चमकोगिरीत चुकीची प्रथा पाडली जात असल्याचा आरोप कॉंग्रेस गटनेते शाहू खैरे यांनी केला आहे. 
लोकसभा निवडणुकीपुर्वी विकास कामांचा नारळ फुटला ती कामे थांबविण्याचे आदेश निवडणुक आयोगाने दिले होते. विधानसभा निवडणुकीतही तसा आदेश निघण्याच्या भिती मुळे आचारसंहिता लागण्यापुर्वीचं मोठ्या प्रमाणात विकास कामांचे उदघाटन केले जात आहे. परंतू विकास कामांचा नारळ फोडताना त्या कामांचे ठेकेदारांना कार्यारंभ आदेश न मिळाल्याने कामे वादात सापडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात सिडकोतील मध्यवर्ती उद्यानाचे उदघाटन करण्यात आले. त्यापुर्वी प्रभाग क्रमांक 25 मध्येही खासदार संजय राऊत यांच्या हस्ते विकासकामांचे उदघाटन कण्यात आले. राजवाडा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह, पंचवटीत गोरक्षनगर उद्यानाचे नुतनीकरण, आदी कामांचे भुमिपूजन करण्यात आले. सदरची कामे मंजूर झाल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून ना हरकत दाखला घ्यावा लागतो. परंतू तो न घेताचं कामांचे उदघाटन करण्यात आले. आमदारांकडून विविध विकासकामांचे उदघाटन करताना महापालिकेच्या निधीतून झालेल्या कामांचेही श्रेय घेतले जात असल्याने भाजप मधील नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. 
प्रशासन कोंडीत 
कार्यारंभ आदेश व बांधकाम विभागाचा ना हरकत दाखला मिळाला नसतानाही उदघाटनाचा सपाटा लावण्यात आल्याने प्रशासन देखील अस्वस्थ झाले असून भुमिपूजनाला उपस्थित नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. उदघाटन झालेल्या कामांवर आक्षेप घेण्याची तयारी कॉंग्रेसने सुरु केली असून 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT