st bus  sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : साक्री ते पुणे विनाथांबा बस सुरू

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : साक्री तालुक्यातील प्रवाशांसाठी साक्रीहून विनाथांबा (नॉन स्टॉप) साक्री ते पुणे बस सुरू करण्यात येत असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी तथा साक्री आगाराचे पालक अधिकारी सौरभ देवरे यांनी शुक्रवारी (ता. १७) दिली.(Sakri to Pune non-stop bus service starts dhule news)

साक्रीहून रोज रात्री नऊला ही बस निघेल. पिंपळनेर येथे एक थांबा घेऊन थेट चाकण, भोसरी, नाशिक फाटा येथे थांबेल व शिवाजीनगरला सकाळी सहाला पोचेल. तसेच पुणेहून रोज रोज रात्री दहाला त्याच मार्गाने पुणे-साक्री निघेल.

चाकणपर्यंत प्रवासी घेईल. नंतर थेट पिंपळनेर व साक्रीला बस थांबेल. या नवीन सेवेने नोकरदार वर्ग, विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. कमी अंतराच्या प्रवासामुळे कमीत कमी वेळात साक्रीहून बस पुण्याला पोचणार आहे.

परिवहन महामंडळाने प्रवाशांना खासगी बसप्रमाणे आरामदायी सेवा देत पण माफक दरात सुरक्षित सेवा देण्याचा उद्देश ठेवला आहे.

साक्रीहून पुण्याकडे व पुण्याहून साक्रीकडे येणाऱ्या प्रवाशांनी बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय वाहतूक अधिकारी तथा साक्री आगाराचे पालक अधिकारी सौरभ देवरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT