No Payment esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : पोलिसपाटलांचा दसरा मानधनविनाच; गावात मान पण धन रखडले

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : पोलिसपाटील हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा घटक आहे. गृह तसेच महसूल विभागाला वेळोवेळी मदत करून गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करीत असतो. शासनाचा तिसरा डोळा म्हणूनही पोलिसपाटलाकडे बघितले जाते. (Salary has not been received for five months by police patil dhule news)

यांना मान आहे पण वेळेवर धन मिळत नाही. गेल्या पाच महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यांचा दसरा मानधनविनाच गेला. आता दिवाळीपूर्वी तरी मानधन मिळावे, ही मागणीवजा अपेक्षा जिल्ह्यातील पोलिसपाटलांकडून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात उच्चशिक्षित युवक परीक्षा देऊन पोलिसपाटील झाले आहेत. त्यांना पाच महिन्यांपासून मानधन वेळेवर मिळालेले नाही. मानधनावर उदरनिर्वाह चालविणाऱ्या पाटलांवर उपवासाची वेळ आली आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिलाय. त्यांना सहा हजार पाचशे असे अत्यल्प मानधन आहे.

मान असल्याने ‘नो काम’

मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या पाटलांना मोठा मान असल्याने प्रतिष्ठा जपण्यासह पोलिसपाटील आहेत. म्हणून कामावरही बोलवत नाहीत. अत्यल्प मानधनावर खर्च पेलवत नाही. पाच महिने होतात तेव्हा एका महिन्याचे मानधन मिळत असल्याचे पोलिसपाटलांनी सांगितले.

"विविध बैठकी व प्रवासासाठी कोणताही भत्ता दिला जात नाही. वेळेवर मानधन नसल्याने बहुतांश पोलिसपाटील कामाच्या शोधात असतात. दिवाळीला बोनसही मिळत नाही. मानधन वेळेवर देऊन दसरा दिवाळी गोड करण्याची अपेक्षा आहे." -युवराज माळी, कार्याध्यक्ष पोलिसपाटील संघटना, शिंदखेडा

"मेपासून मानधन नाही. बहुतांश पोलिसपाटलांचा उदरनिर्वाह मानधनावरच आहे. हे मानधन वेळेवर मिळायला हवे." -संदेश पाटील, तालुकाध्यक्ष, धुळे तालुका पोलिसपाटील संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT