Dandiya esakal
उत्तर महाराष्ट्र

Navratri 2023 : मालेगावी नवरात्र उत्सवात 5 लाख टिपऱ्यांची विक्री

सकाळ वृत्तसेवा

Navratri 2023 : शहर व तालुक्यात नवरात्र उत्सव हर्ष उल्हासात साजरा होत आहे. टिपरी व गरबा नृत्याचा थरार गेल्या आठ दिवसापासून सर्वत्र सुरू आहे. गरब्यासाठी लागणाऱ्या टिपऱ्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. विविध भागात सुमारे पाच लाख टिपऱ्यांची विक्री झाली.

टिपरी विक्रीतून येथे पंधरा दिवसात लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे. टिपरी नृत्य शहराबरोबरच गाव व वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचले आहे.(Sale of 5 lakh dandiya in malegaon during Navratri festival nashik news )

शहरासह तालुक्यात शेकडो मंडळांकडून नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. यावर्षी टिपरी व गरबा नृत्याचा थरार ग्रामीण भागातही प्रकर्षाने दिसून आला. आबालवृद्ध टिपरी नृत्याचा आनंद घेत आहेत. तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्र उत्सवाची धूम आहे. नागरिकांनी घटस्थापनेच्या आधीच टिपऱ्या खरेदी करण्यास सुरुवात केली होती.

गेल्या पंधरा दिवसात येथे सुमारे पाच लाखावर टिपऱ्यांची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. लाकडी, स्टील, अॅल्युमिनियम, दोन कलर, तीन कलर, बेअरिंग, सळी या विविध प्रकारच्या टिपऱ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. कसमादे परिसरात तयार होणारी टिपरी मजबूत आहे.

त्यामुळे या टिपरीला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पसंती दिली. येथे फॅन्सी टिपरी गुजरात येथून विक्रीसाठी आल्या आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टिपऱ्यांचा विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. येथे दहा रुपयापासून शंभर रुपयापर्यंत टिपऱ्यांचे जोड विकले गेले. लेस, बेअरिंग टिपऱ्यांनाही ग्राहकांनी पसंती दिली.

''नवरात्र उत्सव काळात टिपऱ्या, सजावट साहित्याने मोठ्या प्रमाणात मागणी होती. शहराबरोबरच ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्या वाढली. रांगोळी विक्रीतही वाढ झाली आहे.''- सुधीर मुसळे, संचालक, नम्रता जनरल स्टोअर्स, मालेगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT