Kusumba: Suvarna Bhadane, the Sarpanch of Ajang, while giving fire to his mother. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : सरपंच कन्येकडून आईला अग्निडाग; सुवर्णा भदाणे यांनी जपला फुले-शाहूंचा वारसा

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील उषाबाई हिरामण माळी (वय ५८) यांचे हृदयविकाराने गुरुवारी निधन झाले.

एकुलती मुलगी असल्याने मुलाचा वारसा समजून सुवर्णा भदाणे या सरपंचकन्येने आईला अग्निडाग देऊन महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले, शाहू-आंबेडकरांच्या विचारांना चालना दिली.

उषाबाई माळी यांना एकच मुलगी असून, त्यांचे अजंग (ता. धुळे) येथील सासर आहे. विशेष म्हणजे सुवर्णा माळी अजंगच्या सरपंच आहेत. त्या अजंग येथील प्रगतिशील शेतकरी गणेश पुंडलिक भदाणे यांच्या पत्नी आहेत. (Sarpanch daughter set fire to mother in Kusumba Suvarna Bhadane preserved legacy of Phule Shah Dhule News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उषाबाई माळी यांचे गुरुवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पतीचेही दहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. सुवर्णा भदाणे त्यांची एकुलती कन्या आहेत. उषाबाई माळी कुसुंबा येथेच पुतणे विनोद माळी व दीपाली माळी यांच्याकडे राहत होत्या.

तब्येत बरी नसल्याने त्या जवळच्याच दवाखान्यात चालत गेल्या, मात्र तेथे गेल्यावर उपचाराआधीच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्यावर कुसुंबा येथे अंत्यसंस्कार करण्यात येऊन सरपंच सुवर्णा भदाणे यांनी त्यांना अग्निडाग दिला. या वेळी अजंगचे उपसरपंच मनोहर पाटील, सदस्य निंबा पाटील, अशोक मालचे, दिनेश माळी, सोसायटीचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, उपाध्यक्ष कैलास थोरात, आनंदा भदाणे, ॲड. नंदकुमार खलाणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT