Village Development Officer Mukesh Kapure while guiding the attendees regarding the Village Development Plan  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : शाश्वत विकासावर होणार एसडीजी आराखडा; पदाधिकाऱ्यांनी घेतले ग्रामविकास आराखड्याचे धडे

सकाळ वृतसेवा

Nandurbar News : राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत ग्रामविकास आराखड्यासंदर्भात तळोदा तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर शहरातील आदिवासी सांस्कृतिक भवनात पार पडले. या शिबिराला ३०० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत २०२३-२४ मधील प्रशिक्षण उपक्रमांना शासनाने मान्यता दिली असून शाश्वत विकासावर आधारित उपक्रम विहित मुदतीत पूर्ण करावयाचे आहे.

त्याअनुषंगाने ग्रामपंचायतीचा २०२३-२४ चा ग्रामविकास आराखडा तयार करताना शाश्वत विकासावर आधारित एसडीजी आराखडा तयार करावयाचा असल्याने प्राचार्य पंचायत राज प्रशिक्षण केंद्र खिरोदा यांचे मार्फत ग्रामंपचायतमधील सरपंच, उपसरपंच, संगणक परिचालक, ग्रामसभा मोबिलायझर, जलसुरक्षक यांचे प्रशिक्षण कार्यक्रम तळोदा पंचायत समितीच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे.

प्रशिक्षण शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, गटविकास अधिकारी पी. पी. कोकणी, पंचायतराज प्रशिक्षण केंद्र खिरोदाचे प्राचार्य श्री. महाजन, अर्जुन वळवी, उपसभापती विजयसिंह राणा, विस्ताराधिकारी बी. के. पाटील, विस्तार अधिकारी बी. डी. मोहिते उपस्थित होते.

प्रशिक्षण शिबिराच्या पहिल्या दिवशी तळोदा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामसभा, मोबिलायझर, जलसुरक्षक असे मिळून एकूण ३०० प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रशिक्षण शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षक जगन्नाथ राजपूत, ग्रामविकास अधिकारी मुकेश कापुरे यांनी विविध बाबींची माहिती दिली.

शिबिराच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी संगणक परिचालक, सरपंच व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांना प्रशिक्षण देण्यात आले. यात अंमलपाडा, रामपूर, रतनपाडा, अमोणी, रापापूर, धवळीविहीर, कोठार, चौगाव खुर्दे, खर्डीबु, भवर, बुधावल, दलेलपूर, इच्छागव्हाण, काझीपूर,

खुशगव्हाण, बेलीपाडा, लोभाणी, मोदलपाडा, नळगव्हाण, नर्मदानगर, पिंपरपाडा, राजविहीर, राणापूर, रेवानगर, रोइवे, रोझवे पुर्न, सरदारनगर, शिर्वे, सोमावल बु, सोमावल खु, झिरी या ग्रामपंचायतींचा समावेश होता.

उर्वरित आमलाड, खरवड, खेडले लाखापूर, बोरद, चौगाव, लाखापूर फॉ, छोटा धनपूर, चिनोदा, दसवड, धानोरा, कढेल, करडे, धनपूर, सिलींगपूर, खर्डी, सावरपाडा, राणीपूर, अलवान, मालदा, मोड, मोहिदा, मोरवड, नवागाव, न्युबन, प्रतापपुर, बंधारा,

पाडळपुर, रांझणी, जिवननगर, सलसाडी, तळवे, तऱ्हावद, गंगानगर, तुळाजा, वाल्हेरी यांना शुक्रवारी (ता. २६) प्रशिक्षित करण्यात येणार आहे.

शाश्वत विकासाच्या नऊ संकल्पना

या प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षणार्थींना गरिबीमुक्त आणि उपजीविकायुक्त गाव, आरोग्यदायी गाव, बाल स्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव, स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा युक्त गाव, सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासन युक्त गाव, लिंग समभाव पोषक गाव या ग्रामपंचायत शाश्वत विकासाची नऊ संकल्पना समजावून सांगण्यात आल्या.

आमचं गाव आमचा विकास आराखडा २०२४-२५ च्या तयारीसाठी आवश्यक बाबी पूर्व नियोजन, ग्रामसभांचे नियोजन, ग्रामसंसाधन गटांची निर्मिती व प्रत्यक्ष आराखड्याची अंमलबजावणी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

‘धुरंधर’च्या टीमची तब्येत बिघडण्याचं खरं कारण समोर; सेटवरील जेवण नाही तर लेहमध्ये पसरलेलं मोठं फूड कंटॅमिनेशन

Stock Market Closing: शेअर बाजार वाढीसह बंद; सलग सहाव्या दिवशी तेजी, कोणते शेअर्स चमकले?

Bail Pola 2025: डिजेपासून बैलांना त्रास! शेतकऱ्यांना ‘ॲनिमल राहत’कडून १० सूचना

SCROLL FOR NEXT