Corona Vaccine esakal
उत्तर महाराष्ट्र

4 लाख नागरिक लसीकरणापासून दूर

निखिल सूर्यवंशी - सकाळ वृत्तसेवा

धुळे : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी जिल्ह्यात १९ लाखांवर पात्र लाभार्थी आहेत. लसीकरण मोहीम सुरू होऊन जूनमध्ये दीड वर्ष पूर्ण होत असताना १२ ते ६० वयोगटातील चार लाख १९ हजार ५९४ लाभार्थ्यांनी अद्याप एकही डोस घेतला नसल्याचे समोर येते. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी बुधवारपासून (ता. १) जिल्ह्यात ‘हर घर दस्तक’ मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे.

शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी घरोघरी लस देण्यासाठी ‘घर घर दस्तक’ ही मोहीम पार पडेल. आतापर्यंत १८ लाख ९७ हजार ६७७ पैकी १४ लाख ७८ हजार ८३ नागरिकांनी पहिला, तर ११ लाख ८६ हजार २३० जणांनी दुसरा डोस घेतला आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत दोन्ही डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ६२.५१ टक्के आहे. लसीकरणाचा टक्का वाढण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन लस न घेणाऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे. जिल्ह्यात कोविशील्ड, कोव्हॅक्सिन, कॉर्बोव्हॅक्स लसीसह निडल मुबलक उपलब्ध आहेत.

गाव, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व तालुकानिहाय सूक्ष्मकृती आराखड्यातून पहिला व दुसरा डोस न घेतलेल्यांची माहिती संकलित होईल. त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले जाईल. ग्रामीण व शहरी भागात पथक कार्यरत असेल. तसेच १३ जूनपासून शाळा सुरू झाल्यावर मुलांना लसीकरण केले जाईल. तसेच पथक घरोघरी जाईल. लसीकरणाचा वेग वाढीसाठी शासनाच्या सूचनेनुसार काम होईल, असे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. प्रसन्ना कुलकर्णी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway: कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेसचे डबे वाढणार, लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी होणार! रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Marriage Blessing Temple India : अजूनही 'सिंगल' आहात? लग्न ठरत नाहीये? 'या' प्राचीन मंदिरात कमरेला माळ बांधून फक्त 9 प्रदक्षिणा मारा, मग लग्न ठरलंच म्हणून समजा...!

Gudi Padwa 2026: यंदा गुढी पाडवा 18 की 19 मार्चला? जाणून घ्या तारीख, वेळ, शुभ मुहूर्त अन् सणाचे महत्त्व

Love Marriage : 'या' ठिकाणी मुलींच्या लव्ह मॅरेजला फूल पर्मिशन; आवडला पुरुष की कर लग्न! वाटेल तेव्हा घटस्फोट, शेजारील देशाशी आहे संबंध

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये दोन वर्षांच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृ्त्यू

SCROLL FOR NEXT