Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : मुलीवर लैंगिक अत्याचार; एकास 7 वर्षे सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : साक्री तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गोटू ऊर्फ रवींद्र चौधरी (कोकणी) याला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती वाय. जी. देशमुख यांनी हा निकाल दिला.

साक्री तालुक्यातून गोटू ऊर्फ रवींद्र बाबूराव चौधरी याने आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळवून नेले. ही घटना २४ ऑगस्ट २०१७ ला घडली होती. नंतर पीडितेला नाशिक येथे नेत रवींद्रने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.(Sexual assault on a girl Forced labor for one and seven years Result of Deshmukh Incident of Sakri Taluka Dhule Crime News)

घटनेबद्दल साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पीडितेचे वडील व नातलगांनी अल्पवयीन मुलीसह रवींद्र याला २८ ऑगस्ट २०१७ ला गावी आणले. पीडितेला विश्वासात घेत विचारपूस केल्यावर तिने अत्याचार झाल्याचे सांगितले.

याप्रकरणी धुळे न्यायालयात न्या. श्रीमती देशमुख यांच्या समक्ष कामकाज सुरू होते. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. शुभांगी जाधव यांनी बाजू मांडली. उपलब्ध पुरावे, संदर्भ व युक्तिवाद ग्राह्य धरून रवींद्र चौधरी याला दोषी ठरविण्यात आले.

तसेच त्याला सात वर्षे सक्तमजुरी व २७ हजारांचा दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारी वकील शुभांगी जाधव यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तंवर, प्रभारी सहायक संचालक तथा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. संजय मुरक्या यांनी सहकार्य केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT