Local leaders of Mahavikas Aghadi gathered for the election of Agricultural Produce Market Committee
Local leaders of Mahavikas Aghadi gathered for the election of Agricultural Produce Market Committee  esakal
उत्तर महाराष्ट्र

Shahada Market Committee Election : महाविकास आघाडी रिंगणात; सर्व 18 जागा लढविण्याचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा

शहादा (जि. नंदुरबार) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व १८ जागा लढविण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या तिन्ही घटकपक्षांनी केला असून, शुक्रवारी (ता. ३१) अर्जही खरेदी करण्यात आले. (Shahada Market Committee Election Maha Vikas Aghadi determination to contest all 18 seats nandurbar news)

शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. ३ एप्रिल अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर (स्व.) पी. के. अण्णा पाटील गटाची सत्ता आहे.

यंदा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गट या तिन्ही गटांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची स्वतंत्र बैठक डोंगरगाव रस्त्यावरील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडली.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व जागा लढविण्याचा एकमुखी निर्णय बैठकीला उपस्थित नेत्यांनी घेतला. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत निवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढाविण्याचे जाहीर करून शुक्रवारी महाविकास आघाडीतर्फे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयातून सर्व १८ जागांसाठी अर्ज खरेदी करण्यात आले असून, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

बैठकीला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉक्टर सुरेश नाईक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव पाटील, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, काँग्रेसचे किसान सेलचे गणेश राजे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र लोहार, शहरप्रमुख सागर चौधरी यांच्यासह महाविकास आघाडीच्या तिन्ही घटकपक्षांच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT