Shanimandal: Devotees line up here for darshan on the occasion of Shani Amavasya. esakal
उत्तर महाराष्ट्र

Yatrotsav : साडेसाती मुक्तीपीठ शनिमांडळ येथे शनी अमावस्या यात्रोत्सवात भाविकांच्या रांगा

सकाळ वृत्तसेवा

शनिमांडळ (जि. नंदुरबार) : साडेसाती मुक्तीपीठ म्हणून भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिमांडळ येथे शनी अमावस्येनिमित्त यात्रोत्सव मोठ्या उत्साहात होत असून हजारो भाविकांनी पहाटेपासून शनिदेवाचे दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. (Shanimandal shani amavasya yatrotsav started with high number of devotee nandurbar news)

साडेसाती पासून मुक्तता मिळावी यासाठी भाविक हजारोच्या संख्येने क्षणी मंडळ येथे शनिवारी येणाऱ्या अमावस्येला म्हणजेच शनी अमावस्येला दर्शनासाठी येत असतात. भारतात शनि देवाची अनेक मंदिरे आहेत पण ती शनी मंदिरे शक्तीपीठ म्हणून ओळखले जातात.

मात्र शनिमांडळ येथील शनी मंदिर हे साडेसाती मुक्तीपीठ म्हणून प्रचलित आहे, येथे महिलांना थेट शनि देवाच्या मूर्ती पर्यंत प्रवेश दिला जातो. ग्रामस्थांतर्फे महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यात्रेकरूंना मार्गदर्शन करण्याबरोबर आणि व्यवस्थेसाठी गावातील लोक मंडळांचे सहकार्य आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

सकाळी पाच ते रात्री उशिरापर्यंत हे युवक कार्यरत होते. यात्रेनिमित्त तेल नारळ उडीद यासह पूजेच्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात विक्री झाले. अन्य वस्तूंचे दुकाने थाटले गेले. ग्रामपंचायत प्रशासन व विश्वस्त मंडळातर्फे शनी अमावस्येनिमित्त येणाऱ्या भाविकांचे गाडी पार्किंग पासून तर थेट दर्शनापर्यंतची सगळी व्यवस्था चोख केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action On Banks: आरबीआयने मुंबईतील ५२ वर्षे जुन्या बँकेचा परवाना केला रद्द ; तुमचंही खातं आहे? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

Pune Businessman Death : पुणे हादरलं! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू; आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल? मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी

Latest Marathi News Live Update : सीबीआय संचालक निवडीसाठीच्या बैठकीनंतर राहुल गांधी पंतप्रधान निवासस्थानातून रवाना

GT vs SRH Live : साई सुदर्शनने इतिहास रचला! गुजरातचा डोलारा सांभाळला; हैदराबादविरुद्ध विक्रमी खेळी अन् आव्हानात्मक लक्ष्य

Gold Crisis Explainer: १.४ अब्ज भारतीयांना १ वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन भारताची अर्थव्यवस्था बदलू शकते का?

SCROLL FOR NEXT