Vijaykumar Gavit esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : उंदीरही सापडत नाही त्या जागेवर अभयारण्य नकोच! मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींचा सूर

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : उंदीरही सापडत नाही, त्या जागेला अभयारण्य (Sanctuary) म्हणायचे का, अशा शब्दात अनेर अभयारण्याविषयी नापसंती दर्शवून राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी अभयारण्याचा दर्जा काढून घ्यायला हवा, असे मतप्रदर्शन केले. (Shirpur does not want a sanctuary Ministers and people representatives opinion in program in Lauki dhule news)

शतकोटी वृक्षलागवडीसारख्या योजना राबविणाऱ्या भाजपच्या मंत्र्यांनी १९८६ पासूनच्या अभयारण्याबाबत असे मत व्यक्त केल्याने शिरपूर तालुक्यासह जिल्ह्यात विविध चर्चा रंगते आहे.

लौकी (ता. शिरपूर) येथील भूमिपूजन समारंभात शुक्रवारी (ता. ७) मंत्री डॉ. गावित म्हणाले, की अभयारण्यातील जुन्या पाड्यांना शाळा व अन्य सुविधा देताना अडचणी येतात. खरेतर तेथे एक उंदीरही सापडणार नाही.

मी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारलेही की इथे कोणते प्राणी, पक्षी आहेत ते मलाही दाखवा, पण काहीच नाही. त्यांच्या या विधानानंतर हास्यस्फोट झाला खरा, पण नंतर मात्र अभयारण्याबाबत चर्चेला सुरवात झाली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

आमदार काशीराम पावरा यांनी या विषयाला सुरवात केली. अनेर अभयारण्य जाहीर करण्यापूर्वी तेथे आदिवासी पाडे अस्तित्वात आहेत. त्यांच्यासाठी अंगणवाडी, शाळाही मंजूर आहे. पण वन्यजीव विभाग तेथे बांधकामाला परवानगी देत नाही. त्यामुळे त्यांचा विकास रखडला आहे.

लोकांचा विकास थांबत असेल तर अभयारण्य नकोच. पाठोपाठ खासदार डॉ. हीना गावित म्हणाल्या, की अभयारण्याच्या दर्जाबाबत संसदेत आणि धुळे येथे नियोजन मंडळाच्या बैठकीतही प्रश्न उपस्थित केला.

तालुक्यातील वनास दिलेला अभयारण्याचा दर्जा तातडीने काढून घेतला पाहिजे. तसा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठविला पाहिजे. मात्र सध्यातरी अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी सुरू आहे, मात्र तसे केल्याशिवाय विकास होणार नसल्याने या प्रश्नाचा पाठपुरावा केला जाईल.

दृष्टिक्षेपात अनेर अभयारण्य

विभाग- संभाजीनगर वन्यजीव, स्थान- शिरपूर व चोपडा तालुका सीमेवर, सीमा- यावल (जळगाव) वन्यजीव अभयारण्य व मध्य प्रदेशातील खरगोन जंगल, घोषणा- १३ नोव्हेंबर १९८६, क्षेत्रफळ : ८२.९७ वर्ग किलोमीटर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC World Cup : वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल; नवी मुंबईच्या डी वाय पाटीलवर होणार फायनलसह ५ सामने

Akola News: धावत्या रेल्वेत महिलेने दिला बाळाला जन्म; रेल्वे स्टेशनवर डॉक्टरच्या अनुपस्थितीने संताप

'या' ठिकाणी झालेलं 'आयत्या घरात घरोबा' या गाजलेल्या चित्रपटाचं चित्रीकरण; पाहून वाटत नाही पण तो बंगला...

Maharashtra Latest News Live Update : रायगडमध्ये बैलपोळ्याचा जल्लोष

Anna Hazare : देवेंद्र फडणवीस चांगलं काम करतात...भ्रष्टाचाराचं कोणतं प्रकरण कानावर आलं नाही...अण्णा हजारेंकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक!

SCROLL FOR NEXT