Uddhav Thackeray
Uddhav Thackeray esakal
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackeray : धुळ्यातील शिवसैनिकांनी सुपूर्द केली अडीच हजार शपथपत्र

सकाळ वृत्तसेवा

धुळे : जिल्ह्यातून पहिल्या टप्प्यात अडीच हजार शिवसैनिकांची शंभर रुपयांच्या मुद्रांकावरील शपथपत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुंबई भेटीत सुपूर्द झाली. त्यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी श्री. ठाकरे यांनी संवाद साधत प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानावर भर देण्याची सूचना दिली. तसेच जिल्ह्यातील शिवसैनिक श्री. ठाकरे यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली. (Latest Marathi News)

जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना श्री. ठाकरे यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी उपस्थितीचे निर्देश दिले होते. धुळे- नंदुरबारचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, जिल्हा संघटक भगवान करनकाळ, महानगरप्रमुख धीरज पाटील, जिल्हा समन्वयक कैलास पाटील, विधानसभा संघटक डॉ. सुशील महाजन, शहर समन्वयक भरत मोरे आदी उपस्थित होते. त्यांनी जिल्ह्यातर्फे अडीच हजार शपथपत्र पक्षप्रमुख ठाकरे यांना सुपूर्द केले.

श्री. ठाकरे म्हणाले, की वाढदिवसानिमित्त हारतुरे न आणता शिवसैनिकांनी शपथपत्र व प्राथमिक सदस्य नोंदणीचे अर्ज द्यावेत. काही आमदार शिवसेनेपासून वेगळे झाले असले तरी तळागाळातील शिवसैनिक शिवसेनेसोबत आहे. त्यामुळे आपण सर्व लढाई जिंकू व राज्यात शिवसेना ताठ मानेने पुन्हा उभी राहील. प्राथमिक सदस्य नोंदणीसाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे. आता पुढची लढाई ५० लाख

प्राथमिक सदस्य नोंदणी पूर्ण करण्याची असून, ती जिंकायची आहे, असा विश्‍वास श्री. ठाकरे यांनी दिला. जिल्ह्यात शपथपत्र भरुन घेण्यासाठी स्थानिक सर्व पदाधिकारी, उपमहानगरप्रमुख, तालुकाप्रमुख, संघटक, समन्वयक, सहसमन्वयक, सहसंघटक, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुखांचे सहकार्य लाभत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

lok sabha result: "उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग..."; लोकसभेच्या निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय घोषित

Fact Check: मुंबईतील भाजपच्या निवडणूक किटमध्ये 'गोल्ड बिस्किटे' नव्हती; खोट्या दाव्यासह फोटो अन् व्हिडिओ व्हायरल

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने संपवलं जीवन; जळगावच्या जामनेर येथील घटना

Team India Head Coach : लक्ष्मण होणार द्रविड यांचे उत्तराधिकारी? गंभीर, लँगर यांचीही नावे चर्चेत

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी अन् प्रफुल्ल पटेलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला - संजय राऊत

SCROLL FOR NEXT