esakal
उत्तर महाराष्ट्र

Mahashivratri 2023 : श्री महादेवाच्या 40 फूट मूर्तीसह सजीव देखाव्यांचे आकर्षण!

सकाळ वृत्तसेवा

धुळे : महाशिवरात्रीनिमित्त येथील पांझरा नदीकिनारी श्री कालिकामाता मंदिराजवळ शनिवारी (ता. १८) सायंकाळी सातला हिंदू धर्म प्रचारक कालिचरण महाराज यांची हिंदू धर्मजागरण सभा आणि सिद्ध रुद्राक्षांच्या वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. (Shobhayatra Attraction of lively scenes with 40 feet idol of Sri Mahadev dhule news)

तत्पूर्वी, सकल हिंदू समाजातर्फे शहरात बुधवारी (ता. १५) सायंकाळी श्री महादेवाच्या ४० फूट मूर्तीसह सजीव देखावे, कलशधारी महिला आणि काहींनी धरलेला फुगडीचा घेर शोभायात्रेचे आकर्षण ठरले. या वेळी ‘हर हर महादेव’ असा गजर झाल्याने शोभायात्रेचा मार्ग दुमदुमला.

शोभायात्रेचा मार्ग भक्तिभाव, चैतन्यासह भाविकांच्या मांदियाळीने फुलला. सजीव देखावे, तांडव नृत्य, लेझीम पथक, कलशधारी महिलांनी धुळेकरांचे लक्ष वेधले. महाशिवरात्रीच्या पावन

पर्वानिमित्त सकल हिंदू समाज, विराट हिंदू जागरण समिती व भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या पुढाकाराने बुधवारी सायंकाळी पाचला आग्रा रोडवरील प्रभाकर थिएटरजवळील श्री खंडेराव महाराज मंदिरापासून देवाधिदेव श्री महादेवाच्या ४० फूट उंचीच्या भव्यदिव्य मूर्तीची शोभायात्रा निघाली.

सजीव देखावे आकर्षण

खासदार डॉ. सुभाष भामरे, पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी, भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर नागसेन बोरसे यांच्या हस्ते महाआरती झाली.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

नंतर हर हर महादेवाच्या गजरात शोभायात्रेला सुरवात झाली. धार्मिक बँडपथक, कलशधारी महिला, लेझीम पथक, टाळमृदंगाच्या गजरातील वारकरी मंडळ, शिवपार्वती व अघोरी पथक, संतांचा सजीव देखावा, भगवान शिव व पार्वतीमाता यांचा सजीव देखावा शोभायात्रेचे आकर्षण ठरले.

धर्मध्वज पूजन

शोभायात्रेचा खंडेराव मंदिर, आग्रा रोड, गांधी पुतळा, फुलवाला चौक, स्वामी समर्थ मंदिरमार्गे श्री कालिकामाता मंदिराजवळ समारोप झाला. कालिकामाता मंदिर येथे धर्मध्वज पूजन झाले. माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, जयश्री अहिरराव, राजेश पवार, नरेश चौधरी, भगवान गवळी, ओम खंडेलवाल, सुशील पोपली, संजय शेंडे,

अनिल संचेती, जीवन शेंडगे, चेतन मंडोरे, ॲड. रोहित चांदोडे, भिकन वराडे, दगडू बागुल, बंटी मासुळे, विजय पाच्छापूरकर, प्रा. सागर चौधरी, शशी मोगलाईकर, प्रवीण अग्रवाल, अजय अग्रवाल, डॉ. भूषण चौधरी, मोहन टकले, भाजपच्या बेटी बचाव-बेटी पढाव अभियानाच्या पदाधिकारी अल्पा अग्रवाल, कल्याणी अंपळकर,

मनपा स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, महिला व बालकल्याण सभापती सारिका अग्रवाल, उपसभापती विमल पाटील, नगरसेविका भारती माळी, वंदना थोरात, योगिता बागूल, वंदना मराठे, सुरेखा ओगले यांच्यासह सकल हिंदू समाजबांधव सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT