उत्तर महाराष्ट्र

Dhule News : दुकानदारांनी मनपाचे गाळे सोडावेत; जिल्हा न्यायालय

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील जुन्या महापालिका इमारतीलगत महापालिकेच्या मालकीच्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन मार्केटमधील ४० गाळेधारकांची अपील याचिका जिल्हा न्यायाधीश ओ. डी. क्षीरसागर यांनी रद्द केली. तसेच दुकानधारकांना गाळे रिकामे करण्याचे आदेश दिले. (shopkeepers should leave municipality District Court Dhule News)

महापालिकेच्या राधाकृष्णन मार्केटचे (शॉपिंग सेंटर) १९८९ च्या सुमारास बांधकाम झाले. तेव्हा तत्कालीन धुळे पालिकने शॉपिंग सेंटरमधील गाळे १९९१ मध्ये दुकानदारांना भाडेतत्त्वावर व अनामतीवर दिले.

ते २० वर्षांसाठी दुकानदारांना वापरण्यासाठी दिले. त्यासंबंधी तत्कालीन पालिकेमध्ये ठराव करण्यात आला. गाळेधारकांची मुदत ३१ मार्च २०१० ला संपल्यावर महापालिकेने त्यांना नोटिसा बजावल्या; परंतु दुकानधारकांनी गाळे रिकामे करून दिले नाहीत.

त्यामुळे त्यांना पुन्हा ३ ऑगस्ट २०१५ ला नोटीस देऊन भाडे बाकी व इतर कर बाकीसंबंधी नोटीस देण्यात आली. गाळ्यांचा प्रत्यक्ष कब्जा देण्याचे आदेश महापालिकेने दिले.

नोटिशीसंबंधी आदेशाला गाळेधारकांनी तत्कालीन आयुक्तांपुढे वाद उपस्थित केला. याकामी दुकानदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली. तसेच याकामी सखोल चौकशी करून दुकानदारांनी गाळे रिकामे करावेत, भाडेबाकी द्यावी, तसेच गाळ्यांचा लिलाव करावा, असाही आदेश देण्यात आला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

संबंधित दुकानदारांना लिलावामध्ये भाग घेता येईल, असाही आदेश जानेवारी २०१६ मध्ये दिला. या निर्णयाविरुद्ध गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात ४० अपिले दाखल केली. न्यायालयाने चौकशीअंती गाळेधारकांचे अपील फेटाळून लावले.

अपीलकर्त्यांचा गाळ्यावरील कब्जा गैरहक्की असल्याचेही आदेशात नमूद केले. तत्कालीन महापालिका आयुक्तांनी दिलेला आदेश योग्य असल्याचे निकालपत्रात नमूद केले. गाळेधारकांनी ३१ जुलै २०२३ पर्यंत मनपाला कब्जा द्यावा, त्यांनी दिलेल्या भाडेसंबंधी हिशेब करून निर्णय घ्यावा, असाही आदेश न्यायालयाने दिला.

महापालिकेतर्फे ज्येष्ठ अॅड. ए. बी. शहा यांनी कामकाज पाहिले. त्यांनी महापालिकेची प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांना उपायुक्त तथा कर मूल्य निर्धारण अधिकारी पल्लवी शिरसाट, अधीक्षक किशोर सुडके, महापालिकेमधील बाजार विभागातील अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: जंगलावर कुणाचा डोळा? CJI Suryakant यांच्या संतापानंतर राज्य सरकार अडचणीत, वनजमिनीवर हात टाकणाऱ्यांची आता खैर नाही?

Gold Price Today : सोने सलग दुसऱ्या दिवशी महागले, नव्या वर्षात नवा उच्चांक गाठणार, जाणून घ्या तुमच्या शहरात आज काय आहे भाव?

Silver Price Hike : चांदीच्या दरात दहा हजार रुपयांची, दरवाढ कमी होणार नाही तज्ज्ञांचा अंदाज

Pune Book Festival: पुस्तक महोत्सवात ५० कोटींची उलाढाल; ३० लाखांपेक्षा जास्त पुस्तकांची विक्री, साडेबारा लाख नागरिकांनी दिली भेट

Pune Accident: 'अक्कलकोटचे मायलेक रेल्वेच्या धडकेत ठार'; पिंपरी-चिंचवडमधील घटना, अंत्यविधीसाठी गावी गेले अन्..

SCROLL FOR NEXT