Kumbhar Tek riot esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : कुंभारटेकवर दंगलीत चाकूने वार; सहा जखमी

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि. धुळे) : शहरातील मोहम्मदिया चौकात इफ्तारसाठी जमलेल्या गर्दीत वाद उद्‍भवल्याने दंगल उसळली. चाकू, लाकडी दांडा अशी हत्यारे वापरून संशयितांनी दगडफेक केली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. (Six injured in knife stabbing at Kumbhar Tek during riot dhule crime news)

शहरातून बाजारात जाणाऱ्या रस्त्यावर मोहम्मदिया चौक आहे. तेथील जाकिर अली सय्यद (वय ५६) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांचे मोहम्मदिया चौकात खाद्यपदार्थ विक्रीचे दुकान आहे. रमजान महिना सुरू असल्याने २८ मार्चला सायंकाळी सहाला त्यांच्या दुकानाजवळ गर्दी होती. गर्दीत काही युवक ‘हम ब्लेड ग्रुपके लडके हैं, किसी को भी मारेंगे’ असे म्हणत गोंधळ घालत असल्याने जाकिर अली यांनी त्यांना उपवास सोडण्याचा वेळ असून, वातावरण खराब करू नका, अशी विनंती केली.

त्यावर संशयित आदिल शेख याने त्याच्या हाताला असलेल्या प्लास्टरच्या बँडेजमधून चाकू बाहेर काढला व जाकिर अली यांचा मुलगा मुझाहिद सय्यद याच्या उजव्या बरगडीवर, हातावर वार केला. त्याच वेळी इतरांनीही लाकडी दांड्याने व दगडफेक करून मारहाण केली. या घटनेत फराज मसूद शेख, साहिल ऐजाज शाह व मुजाहिद सय्यद गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना धुळे येथे रवाना करण्यात आले. जाकिर अली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आदिल अल्लाद्दीन शेख, लंगडे का बाबू तथा इम्रान शेख, जादू तथा फैजान याकूब शेख, यामिन इरफान मिर्झा, जमील बुढा, फरान सैफुद्दीन मुल्ला, रिजवान सैफुद्दीन मुल्ला, दानिश तथा आबा मिर्झा, जुनैद इकबाल मिर्झा, समीर तथा बबलू सईद शेख व त्यांचे अन्य चार ते पाच साथीदार यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT