Dhule News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: इंग्रजीचा पेपर दिला अन् मुलाने केला पित्याचा अंत्यविधी; मन सुन्न करणारी घटना

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : इंग्रजीचा पेपर देण्यासाठी तयारी पूर्ण झालेली असतांना अचानक वडिलांचे निधन झाले. संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पण कर्तव्यपूर्तीची उर्मी उसळून आली. पित्याचा मृतदेह घरात ठेवून तो अत्यंत गांभीर्याने परीक्षेला सामोरा गेला. पेपर देऊन आल्यावर मुलाचे कर्तव्य बजावत त्याने वडिलांचे अंत्यसंस्कार केले. मन सुन्न करणारी ही घटना तालुक्यातील विखरण गावात घडली आहे.

विखरण (ता.शिरपूर) येथील भाऊसाहेब झुलाल पवार (वय 50) यांचे सोमवारी (ता.6) पहाटे आकस्मिक निधन झाले. त्यांचा मुलगा हर्षल दहावीच्या वर्गात असून त्याचा सोमवारी इंग्रजी विषयाचा पेपर होता. घरात वडिलांचा मृतदेह असतांना पेपरला कसा जाऊ म्हणून त्याच्या मनाची चलबिचल सुरु झाली. मात्र घरातील मंडळी व नातलगांनी त्याला धीर देत आधी विद्यार्थ्याचे कर्तव्य बजावण्यास सांगितले.

घरातून तो निर्धारित वेळेत साने गुरुजी विद्यालयातील परीक्षा केंद्रावर पोचला. दरम्यान त्याच्यावरील आपत्तीची माहिती शिक्षकांनाही मिळाली होती. त्यांनीही हर्षलचे सांत्वन करुन त्याला धीर दिला. पेपर पूर्ण सोडवून तो घरी पोहचला. त्यानंतर भाऊसाहेब पवार यांची अंत्ययात्रा काढून अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT