crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

पती- पत्नीच्या वादात हस्तक्षेप केल्याने मुलाकडून बापाचा खून

मुलगा व सुनेतील भांडण सोडवणे बापाला चांगलेच महागात पडले

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि. धुळे) : मुलगा व सुनेतील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध बापावर प्राणघातक वार करून मुलाने त्याचा खून केला. ही घटना गुरुवारी (ता.१६) सायंकाळी साडेसहाला उमर्दा (ता.शिरपूर) गावाजवळ कढईपाणी येथे घडली. पेमा हिरा पावरा (वय ७३) असे मयताचे नाव असून त्यांचा मोठा मुलगा सुक्राम पेमा पावरा याने त्यांचा खून केल्याचा संशय आहे.

पती- पत्नीमध्ये नेहमीच व्हायचे वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुक्राम पावरा व त्याची पत्नी बायटीबाई यांच्यात नेहमीच भांडणे होत होती. त्यावेळी पेमा पावरा व त्यांची पत्नी सुनेची बाजू घेऊन मुलाला दटावत असत. त्यामुळे त्याचा आई- वडिलांवर राग होता. त्याने यापूर्वी त्यांना घरातून बाहेर काढले होते.
१६ जूनला सायंकाळी सुक्राम पावराने पत्नीसोबत भांडण उकरून काढले. भांडण सोडवण्यासाठी पेमा पावरा गेले. त्यांनी मध्यस्थी करू नये म्हणून सुक्राम त्यांचे दोन्ही हात धरून झोपडीबाहेर घेऊन आला. त्याचा राग आल्याने पेमा पावरा यांनी त्याला शिवीगाळ केली. त्यामुळे संतापून घरातून तीक्ष्ण हत्यार घेऊन आलेल्या सुक्रामने वडिलांच्या पाठीवर सपासप वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत ते खाली कोसळले. त्यानंतर सुक्राम डोंगराच्या दिशेने पळून गेला. जखमी पेमा पावरा यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. त्यांचा मुलगा विक्रम पावरा याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सुक्राम पेमा पावरा यांच्याविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MVA PC: महायुती सरकार मूलभूत जनप्रश्नांकडे लक्ष देण्यात अपयशी; विरोधकांनी विचारला जाब, अधिवेशनाआधी राजकारण तापले

Mumbai Water Supply: मॉन्सून कोकणातच खोळंबला! मुंबईवर पाणीटंचाईचे संकट, पाऊस कधी बरसणार? मोठी अपडेट समोर

India Squad: फक्त जैस्वालच नाही, 'या' तीन दिग्गजांचीही इंग्लंड दौऱ्यासाठी निवड नाही; एकाची तर ODI करियर संपल्याचीच चर्चा

मुख्यमंत्र्यांना ७ पट दुषित पाणी दिलं, अधिकाऱ्याला धाडली नोटीस

Latest Marathi News Live Update : RSS चे लोक माझ्यावर हल्ला करतील: अभिजीत दीपके

SCROLL FOR NEXT