delegation of Junior College Teachers' Association presenting various demands to Abhinav Goyal. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार; मागण्यांप्रश्‍नी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा पवित्रा

जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (ता. ९) जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यामार्फत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना दिले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (ता. ९) जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यामार्फत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना दिले.

माजी आमदार दिलीप सोनवणे, नाशिक विभागीय अध्यक्ष प्रा. बी. ए. पाटील, जिल्हाध्यक्ष प्रा. सतीश पाटील, प्रा. अतुल पाटील, विद्या पाटील, रूपाली पाटील, वर्षा महाजन, महानगर सचिव प्रा. सागर चौधरी, प्रा. चंद्रशेखर तोरवणे, प्रा. एस. ए. कुळकर्णी, प्रा. एम. एम. बुवा आदींनी दिलेल्या निवेदनाचा आशय असा (statement that 12th answer sheet examination will be boycotted as demands of junior college teachers are not being met dhule news)

सरकारकडून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडविल्या जात नसल्याने आणि त्याविषयी वारंवार आश्वासन देऊनही चर्चा केली जात नसल्याने राज्य व जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने यंदा बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रलंबित मागण्यांमध्ये एक हजार २९८ वाढीव पदांना मान्यता देण्याऐवजी कार्यरत केवळ २८३ शिक्षकांच्या समावेशनाचा आदेश नोव्हेंबर २३ मध्ये काढण्यात आला; परंतु अनेक शिक्षकांचे समावेशन अद्याप झालेले नाही. अनेक शिक्षकांबाबत त्रुटींची पूर्तता होऊनही त्यांच्या समावेशनाचा आदेश निघालेला नाही.

पैकी एकाही शिक्षकाचे वेतन अद्याप सुरू झालेले नाही. आयटी शिक्षकांना वेतनश्रेणी, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, शाळा संहितेनुसार वर्गातील विद्यार्थिसंख्येचे निकष पाळणे आदी मान्य मागण्यांचे आदेश निघाले नाहीत.

मागण्यांबाबत वेळोवेळी चर्चा, निवेदने, आंदोलने करूनही प्रश्‍न मार्गी लागत नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे.

विविध मागण्या

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी अर्धवेळ, विना तसेच अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व निवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा. नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०, २०, ३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी. निवडश्रेणीसाठीची २० टक्क्यांची अट रद्द करावी. सर्व वाढीव पदांना मंजुरी द्यावी व आयटी विषय शिक्षकांना वेतनश्रेणी द्यावी. अनुदानासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात. शिक्षकांची सर्व रिक्त पदे त्वरित भरावीत.

कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकडी मान्यतेसाठी शाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात २१ विद्यार्थी व वरिष्ठ महाविद्यालय संलग्नितमध्ये ३१ विद्यार्थी ग्राह्य धरावेत. उपदानाची रक्कम २० लाख करण्यात यावी व निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे यासह विविध मागण्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT