Stephania vine found in sakri dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : वाल्हवेत आढळली ‘खरुली’ची वेल; आयुर्वेदिक औषधी असल्याने अनन्यसाधारण महत्त्व

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : वाल्हवे (ता. साक्री) भागातील वनक्षेत्रात जैवविविधता टिकून असल्याचे चित्र आहे. गावातील सुशिक्षित युवकास आदिवासी बोलीभाषेत ओळख असलेले ‘खरुली’ नामक कंदमुळाची वेल आढळून आली. आयुर्वेदात तिला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते. (Stephania vine found in sakri dhule news)

‌‌वाल्हवेलगत मोठे वनक्षेत्र असून, या ठिकाणी नैसर्गिक आणि ग्रामस्थांच्या सहभागातून जैवविविधता टिकून आहे. वाल्हवे येथील महेंद्र रमण कडवे या पदवीधर युवकास केवडी वनक्षेत्रात खरुलीचे कंदमूळ आढळून आले. या कंदमुळाचा सर्व भाग आदिवासी बांधव खातात. कंदमुळात औषधी गुणधर्म तर आहेतच शरीराला आवश्यक असलेली पोषक तत्त्वेही असतात.

शिवाय चवही छान असल्याची माहिती आदिवासी बांधव देतात. साधारणत: ही वनस्पती पावसाळ्यात वाढत असून, पहिल्या पावसात कंदमुळासह वेल वाढत असल्याची माहिती निसर्गप्रेमी माध्यमिक शिक्षक पी. पी. पवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. खरुलीची वेल सुमारे तीन ते साडेतीन मीटरपर्यंत झुडपाचा आधार घेत वाढत असते.

या वनस्पतीला पाने, फुले, बिया येतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जमिनीत बिया पडल्यावर नैसर्गिक पद्धतीने वेल वाढत असल्याची माहिती श्री. पवार यांनी दिली. पश्चिम पट्ट्यात अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती आढळतात.

बहुतेक ठिकाणी वनक्षेत्र सुरक्षित नसले तरी काही वनस्पतींमुळे जैवविविधता टिकून असल्याचे समाधानकारक चित्र आहे. कटुरले, मेका, गोमठा, खाजऱ्या कंद, चहू (जंगली केळी), कडू कंद हे कंदमुळाचे आदिवासी बोलीभाषेतील परवलीचे शब्द आहेत. त्यांना शास्त्रीय भाषेत वेगवेगळी नावे आहेत.

शास्त्रीय नाव स्टफेनिया

‘खरुली’चे शास्त्रीय नाव स्टफेनिया असून, फुलांच्या प्रजातीतील एक वनस्पती (कंदमूळ) आहे. जे मूळ पूर्व, दक्षिण आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळते. या वनौषधीयुक्त बारमाही वेली असतात. कंद बटाट्यापेक्षा थोडा लहान, रंग तपकिरी व जमिनीत साधारण पाच ते सहा सेंटिमीटर इतक्या खोलवर असतो. कंद कडवट चवीचा असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial : 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या धर्तीवर होणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक; 350 कोटींचा विकास आराखडा तयार, उदय सामंतांची मोठी घोषणा

Moshi Garbage Dump Collapse : मोशी दुर्घटनेत 25 दिवसांचं बाळ झालं पोरकं, तर 2 आठवड्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवऱ्याचा अंत; नातेवाइकांचा आक्रोश पाहून पाषाणही पाघळेल

Jayden Adams: वर्ल्डकप फुटबॉलमध्ये खेळलेल्या २५वर्षीय आफ्रिका खेळाडूचे निधन

Latest Marathi News Update : तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा वाद थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे

Shreyas Iyer: क्लीन स्वीपनंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा; 'या' चुकीमुळे मालिकाच हातातून गेली! इंग्लंड दौऱ्यात नेमकं काय चुकलं?

SCROLL FOR NEXT