cotton esakal
उत्तर महाराष्ट्र

Cotton News : कापसाचा साठा केल्याने झाला वांधा; जिनींग प्रेसिंग मिल बंद ठेवण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा

धुळे : कापसाला येणाऱ्या काळात जास्तीचा दर मिळेल, अशा अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. त्यामुळे जिनिंग प्रेसिंग मिल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. काही जिनिंग मिल आठवड्यातून तीन दिवस चालविण्याच्या प्रयत्न होत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला सध्या दिला जात असलेला दर कमी आहे. त्यामुळे देशात कापसाचे दर वाढण्याची शक्यता कमी आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी किमान निम्मे कापूस विक्रीस आणला पाहिजे, असे मत केशरानंद जिनिंग मिलचे संचालक ज्ञानेश्वर भामरे यांनी व्यक्त केले.

जिनिंग मिल बंद पडत असल्याने संबंधित काम करणाऱ्यांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात अनेक शेतकरी नगदी पीक म्हणून कापसाचे उत्पादन घेतात. गेल्या काही वर्षांत कापसाला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस उत्पादित करण्याचा मार्ग स्वीकारला. सहाजिकच जिल्ह्यासह खानदेशात अनेक जिनिंग मिल उभारल्या गेल्या. सध्या सात ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल दर दिला जात आहे.

हेही वाचा: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल दहा हजारांपर्यंत दर मिळाला होता. त्यामुळे येणाऱ्या काळात कापसाचे दर वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. जिनिंग मिलमध्ये कापूसच येत नसल्याने आता मिल बंद पडल्या आहेत. अतिशय कमी प्रमाणात कापसाची आवक होत असल्याने आठवड्यातून तीन दिवस जिनिंग मिल चालविण्याचा प्रयत्न होत आहे. पण, मिल चालविण्यासाठी जास्तीचा खर्च येतो. त्यामुळे त्या प्रमाणात कापूस असणे गरजेचे आहे.

मिल बंद असल्याने मिलमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी, कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. आंतराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर ठरत असतात. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपेक्षा देशात कापसाला जास्तीचा दर दिला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कापसाचे दर वाढतील, असे खात्रीने सांगता येत नाही. तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या एकूण कापसापैकी निम्मे विक्रीस आणला पाहिजे, असे मत श्री. भामरे यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

Mahur Renuka Devi Temple: माहूर गडावरील श्री रेणुका देवीला आंब्याची आरास; अधिक महिन्यात भाविकांची मोठी गर्दी

Baramati Sugarcane Farming: पणदरेत ‘ऊस शेतीची नवी दिशा’ परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक दिशा

Chakan Onion Price Row: कांदा दरप्रश्नी चाकण बैठक की राजकीय आखाडा? शेतकरी संघटनेच्या नेत्यांत वाद

Pune Toxic Liquor: पुणे-पिंपरीतील विषारी दारूकांडाचा उगम उरुळीकांचन? स्थानिक तरुणाचा मृत्यू, भेसळ रॅकेटवर संशय तीव्र

SCROLL FOR NEXT