Subsidy of child care scheme at increased nandurbar news  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News: बालसंगोपन योजनेचे वाढीव दराने अनुदान; जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्याची माहिती

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेंतर्गत १ एप्रिल २०२३ पासून दोन हजार २५० प्रमाणे वाढीव दराने अनुदान वितरित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र बिरारी यांनी दिली.(Subsidy of child care scheme at increased nandurbar news )

केंद्रीय बाल न्याय अधिनियम (मुलांची काळजी व संरक्षण) आणि महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियमानुसार अनाथ, एकल पालक, दुर्धर आजार, निराधार, कैद्यांची बालके व संरक्षणाची गरज असलेल्या ० ते १८ वयोगटातील मुला-मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून

देऊन कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे हा बालसंगोपन योजनेचा उद्देश आहे. निकषात बसणाऱ्या एका कुटुंबातील दोन बालकांना या योजनेचा लाभ १८ वर्षांपर्यंत देण्यात येईल. पालकाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख ५० हजारांपेक्षा कमी असावे.

येथे संपर्क साधावा

सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, सर्व अंगणवाडीसेविका, मुख्य सेविका, सर्व तालुका संरक्षण अधिकारी कार्यालये, सखी वन स्टॉप सेंटर जिल्हा रुग्णालय, नंदुरबार, चाइल्ड हेल्पलाइन-१०९८, ६८/२, प्लॉट क्रमांक ३५ ब, सूर्यवंशीनगर, शासकीय वैद्यकीय मुलांच्या वसतिगृहाच्या बाजूला, नंदुरबार, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, प्रशासकीय इमारत कक्ष क्रमांक २२६ टोकर तलाव रोड, नंदुरबार, संजीवनी आदिवासी महिला मंडळ संचलित बालसंगोपन योजना, शिक्षक कॉलनी, जिजामाता रोड, नंदुरबार.

योजनेसाठी सादर करावयाची कादपत्रांची यादी या कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेच्या लाभासाठी व अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र बिरारी यांनी केले आहे.

बालसंगोपन योजनेसाठी पात्रता

-अनाथ किंवा ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही व जी बालके दत्तक देणे शक्य नाही अशी बालके, कामगार विभागाने प्रमाणित केलेले बालकामगार.

-एका पालकाचा मृत्यू, घटस्फोट अशी एकल पालक बालके.

-कुष्ठरोग, एचआयव्ही, कॅन्सर, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले कैदी, तुरुंगात असलेले, दोन्ही पालक दिव्यांग अशा पालकांची बालके.

-तीव्र गतिमंद, एचआयव्ही, कॅन्सर, पॉक्सो अनिधनिमांतर्गत बळी पडलेली व दुर्धर आजार असलेली बालके.

-कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेले, नैसर्गिक आपत्तीमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेली व विधिसंघर्षग्रस्त बालके.

-भिक्षेकरी गृहात दाखल असलेली भिक्षेकरी पालकांची बालके.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT