Vijay Koli with mother Hirabai Koli.
Vijay Koli with mother Hirabai Koli.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Success Story : कष्ट, जिद्दीने मिळवला परिस्थितीवर विजय; पोलिस दलात निवड...!

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : घरची परिस्थिती बेताची असल्याने मुलांना शिकवावे कसे आणि पोटाची खळगी भागवावी कशी असा प्रश्न ज्या कुटुंबाला एकेकाळी सतत पडलेला असायचा, ती परिस्थिती डोळ्यासमोर ठेवत जिद्द, आणि चिकाटीच्या जोरावर त्याच कुटुंबातील मुलाने पोलिस कर्मचारी होऊन आई वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. (success story vijay koli become first police officer in family nandurbar news)

शहादा तालुक्यातील कळंबू येथील मोतीलाल कोळी, आई हिराबाई कोळी हे अल्पभूधारक शेतकरी असून शेती बरोबर मजुरी करतात. मुलगा विजय कोळी या तरुणाने पिंपरी, चिंचवड येथील पोलिस आयुक्तांलयाचे आस्थापनांतील रिक्त असलेल्या २१६ पदांच्या पोलिस भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता.

शारीरिक चाचणी, मैदानी चाचणी त्याच बरोबर लेखी परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन त्याने यश संपादन केले. विजय हा शेतकरी कुटुंबातील मुलगा त्याचे प्राथमिक शिक्षण कळंबू येथील दादासाहेब गुलाबराव बोरसे शाळेत नववी पर्यंत झाले.

पुढे दहावीत काही विषयांत अनुत्तीर्ण झाला. मात्र पुढे शिकायची इच्छा असून परिस्थिती मुळे शिक्षण करायचे कसे व दोघा भावंडांच्या शिक्षणासाठी पैसा कुठून आणावा या विवंचनेतून स्वतः चे शिक्षण अपूर्ण ठेवत भावाच्या शिक्षणासाठी आई, वडिलांना मोलमजुरी कामात मदत केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यानंतर काही दिवस पुणे, नाशिक शहरात हॉटेलमध्ये वेटरचे काम केले. रिकाम्या वेळात अभ्यास करून नंदुरबार येथे सतरा नंबरचा फार्म भरून दहावी उत्तीर्ण झाला. त्यानंतर शहादा तालुक्यातील वडाळी येथे अकरावी, बारावीचे विज्ञान शाखेचे शिक्षण पूर्ण केले.

त्यानंतर पुण्यात एका हॉटेलमध्ये वेटरची नोकरी सांभाळत भरतीची तयारी चालू ठेवली. विजयने २०१८-१९ ला देखील मुंबई, पुणे, नाशिक येथे पोलिस भरतीत प्रयत्न केला होता. मात्र काही गुणांनी अपयशी ठरला, मात्र त्याने जिद्द ठेवत पोलिस दलात भरती होत आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

"आई, वडिलांनी कष्ट माझ्या डोळ्यासमोर ठेवले आहे. परिस्थितीशी दोन हात करत आम्हाला शिकवून मोठे केले तेच त्यांचे आयुष्यभरातील उपकार कधीही न विसरणारे आहेत. जिद्द ठेवल्यास परिस्थितीही हार मानते."- विजय कोळी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आताही बॅगा घेऊन आलोय.. चक्क मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी, संजय राऊतांच्या आरोपाला दिले उत्तर

प्राणघातक होर्डिंग नीट दिसण्यासाठी 8 झाडांना दिलं होतं विष, FIR ही देखील नोंदवला गेला, पण... BMC चा धक्कादायक खुलासा!

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या सेवानिवृत्त ब्रिगेडीयर वर गुन्हा दाखल

Nashik News : बोटावरची शाई दाखवा अन् मोफत दाढी, किंवा हेड मसाज करा! सलून चालकानं लाढवली अनोखी शक्कल

Manoj Jarange : मनोज जरांगे यांची बीडमधील ८ जून रोजीची सभा रद्द; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT